Russian Warships : व्हेनेझुएलाच्या समुद्रात रशियाच्या अण्वस्त्रधारी युद्धनौका अमेरिकेच्या विरोधात तैनात !

  • मित्रराष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी आम्ही कटीबद्ध ! – रशिया

  • तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने जग मार्गक्रमण करत असल्याची चर्चा !

मॉस्को (रशिया) – अमेरिकेने व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना नियंत्रणात घेतल्यानंतर रशियाने थेट अमेरिकेच्या विरोधात दंड थोपटले आहेत. रशिया अमेरिकेपासून काही मैल अंतरावर उभा ठाकला आहे. यामुळेच तिसर्‍या महायुद्धाच्या दिशेने जग पुढे जात आहे का ?, अशी भीती व्यक्त केली जात आहे. रशियाने त्याची अत्याधुनिक क्षेपणास्त्रे असलेली युद्धनौका, तसेच अण्वस्त्रवाहू पाणबुड्या व्हेनेझुएलाच्या समुद्रात तैनात केल्या आहेत.

काही कालावधी आधीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी मादुरो यांना दूरभाषवरून ‘अमेरिकेने काही आगळीक केली, तर साहाय्याला धावून येऊ’, अशा स्वरूपाचे आश्वासन दिले होते. रशियाने त्याच्या ‘नॉर्दर्न प्लीट’मधील सर्वांत शक्तीशाली शस्त्रास्त्रे कॅरिबियन समुद्रात पाठवल्या आहेत. ‘आम्ही आमच्या मित्रराष्ट्राच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी कटीबद्ध आहोत’, अशी चेतावणी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या कार्यालयाने दिली आहे.

दुसरीकडे पेंटागॉन (अमेरिकी संरक्षण मंत्रालय) सतर्क झाले आहे. अमेरिकेच्या फ्लॉरिडा किनारपट्टीपासून रशियाच्या या युद्धनौका केवळ काही मैल अंतरावर आहेत. अमेरिकेनेही प्रत्युत्तर म्हणून तिची विमानवाहू जहाजे अटलांटिक महासागरात तैनात केली आहेत.