आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा आरोप
(मिया मुसलमान म्हणजे बंगाली भाषिक मुसलमान)

गौहत्ती (आसाम) – आगामी विधानसभेच्या निवडणुकांत मिया मुसलमान मतदार बहुसंख्य असलेल्या मतदारसंघांतून लढण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांकडून काँग्रेस पक्षाकडून ३-४ कोटी रुपये मागितले जात आहेत. मागील निवडणुकीतही असेच झाले, असा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसवर केला. आसाममधील १२६ विधानसभेच्या मतदारसंघांपैकी सुमारे २५ मतदारसंघांत मिया मुसलमान मतदार मोठ्या संख्येने आहेत.
🚨 Explosive Charge Against Congress 🚨
“Congress is selling tickets in Miya Muslim–dominated constituencies for ₹3–4 crore each,” alleges Himanta Biswa Sarma.
From appeasement to outright auction – this is the reality of Indian National Congress.
What else can one expect?… pic.twitter.com/XG24vjZQ5q
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 5, 2026
काही उमेदवारांनी आगाऊ रक्कम दिल्याचा दावा
मुख्यमंत्री सरमा पुढे म्हणाले की, काही उमेदवारांनी यासाठी आगाऊ रक्कमही जमा केली आहे. मागील निवडणुकीत विरोधी आघाडीच्या उमेदवारांनी ज्या मतदारसंघांतून निवडणूक लढवली, तेथे काँग्रेसने त्याच्या कार्यकर्त्यांना अर्ज शुल्कही परत केले नाही. काँग्रेसची संपूर्ण रचना पैशांवर चालते, तर भाजपमध्ये उमेदवारीसाठी कोणतेही शुल्क किंवा देणगी घेतली जात नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेस पक्षाने वर्ष २०२६ च्या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागवले असून अर्जासाठी ५० सहस्र रुपये शुल्क निश्चित केले आहे. ही रक्कम परत न मिळणारी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसकडून याहून वेगळी काय अपेक्षा करणार ? |
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !