एम्.आय.एम्.चे माजी खासदार इम्तियाज जलील यांचे विधान !

मुंबई – जर कोणत्याही व्यक्तीने मुसलमान महिलांना चुकीच्या हेतूने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा हात मी कापीन, असे विधान एम्.आय.एम्.चे (‘ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन’चे अखिल भारतीय मुस्लिम एकता संघाचे) माजी खासदार इम्तियाज जलील यांनी केले. महानगरपालिका निवडणुकीतील उमेदवाराच्या समर्थनासाठी प्रचार करतांना बोलत होते.
Former AIMIM MP Imtiaz Jaleel says, “I’ll cut off the hand of anyone who touches Muslim women.”
Which Hindu public representative shows this level of urgency when Hindu women face harassment or abuse?
Why is Jaleel silent on love jihad, harassment, and sexual abuse of Hindu… pic.twitter.com/EUcOL2nQLq
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 5, 2026
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिलेच्या चेहर्यावरून हिजाब (मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र) काढला होता. त्यावर उत्तरप्रदेशाचे मंत्री संजय निषाद म्हणाले होते, ‘‘नितीश कुमार यांनी केवळ नकाबला (चेहरा झाकण्याच्या जाळी असलेले वस्त्राला) तर स्पर्श केला. जर दुसरीकडे स्पर्श केला असता, तर काय झाले असते ?’’ या पार्श्वभूमीवर जलील यांनी वरील विधान केले.
जलील पुढे म्हणाले, ‘‘सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामधील अनेक पक्ष स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणवतात. हे पक्ष गुंड आणि गुन्हेगारी घटकांना पाठिंबा देतात; पण मुसलमानांच्या अधिकारांसाठी उभे रहाण्यास कचरतात.’’ (मुसलमानांच्या अधिकारांसाठी कोण कोण उभे रहाते ?, हे सूज्ञ जनता ओळखून आहे, हे जलील यांनी लक्षात घ्यावे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|
Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !