
ढाका (बांगलादेश) – बांगलादेशाचे राजकारण हादरवणार्या भारतविरोधी शरीफ उस्मान हादी याच्या हत्येविषयी मोठी माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येमागे जमात-ए-इस्लामी पक्षाच्या एका गटाचा हात असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संघटनेंतर्गत चालू असलेल्या सत्तासंघर्षाचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.
🚨 Political Murder Exposed 🚨
Reports say Jamaat-e-Islami orchestrated the assassination of Osman Hadi.
📈 His rising influence among youth & students shook the old guard.
🗳️ With Feb 12 elections nearing, his surge became a threat https://t.co/Z8unnt0diZ pic.twitter.com/76ZNpBLsmY
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) January 3, 2026
सूत्रांच्या माहितीनुसार शरीफ उस्मान हादी याचा राजकीय प्रभाव सतत वाढत होता. विशेषतः तरुण मतदार आणि विद्यार्थी यांच्यामध्ये त्याची लोकप्रियता वाढल्याने जमातमध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. १२ फेब्रुवारीला होणार्या निवडणुकीपूर्वी तो प्रभावी नेता म्हणून समोर आला होता. त्यामुळे पारंपरिक नेतृत्वासाठी तो धोक्याचा ठरत असल्याची भावना निर्माण झाली होती.
ढाका कार्यालयात रचला गेला कट
हादी याला संपवण्याची योजना ढाक्यातील जमातच्या कार्यालयात आखण्यात आल्याची माहिती देण्यात येत आहे. संघटनेतील एका गटाने हादी याला पूर्णपणे राजकारणातून हटवण्याचा निर्णय घेतला होता. याच काळात याची हत्या करण्यासाठी मोठी रक्कम देण्यावर संघटनेच्या आतच मतभेद झाले. आधी एक कोटी टका (बांगलादेशी चलन – ७४ लाख रुपये) देण्याविषयी चर्चा झाली; मात्र एवढ्या महत्त्वाच्या अडथळ्याला हटवण्यासाठी ही रक्कम अपुरी असल्याचे एका गटाचे मत होते, तर दुसरा गट खर्च अल्प ठेवण्याच्या बाजूने होता. या वादातूनच संपूर्ण माहिती संघटनेच्या आतून बाहेर गेल्याचे सांगितले जाते. गोळ्या झाडणार्याला स्वतंत्रपणे मोठी रक्कम देण्यावरही सहमती झाल्याचा दावा आहे.
हत्येचा संबंध भारताशी जोडण्याचा प्रयत्न !
या प्रकरणाचा आणखी एक पैलू म्हणजे काही दिवसांपूर्वी हादी याच्या हत्येचा संबंध भारताशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. ‘आरोपी भारतात पळून गेले असून मेघालयात लपले आहेत’, असा दावा बांगलादेशाच्या पोलिसांनी केला; परंतु बांगलादेश या आरोपांना कोणताही ठोस आधार देऊ शकला नाही. त्यानंतर आरोपी दुबईला गेले असल्याचे सांगण्यात आले; पण त्यालाही प्रमाण उपलब्ध झाले नाही.
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
Venezuela Earthquake : व्हेनेझुएलाच्या भूकंपात आतापर्यंत २३५ जण ठार !
युद्धात अमेरिकेला पाठिंबा देणार्या ‘नाटो’च्या सदस्य देशांना उत्तरदायी धरले पाहिजे ! – इराण
Canada’s International Student : कॅनडामध्ये विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत ६० टक्के घट !
पाकिस्तानने वर्ष १९७१ मध्ये भारताकडून झालेला पराभव आठवावा ! : Akhtar Mengal
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !