काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई आणि त्यांचे कुटुंब यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचे पुरावे सादर करू ! – Assam CM Himanta Sarma

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांचा दावा

डावीकडून हिमंत बिस्व सरमा आणि गौरव गोगोई

गौहत्ती (आसाम) – आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षाचे उपनेते गौरव गोगोई यांच्यावर पाकिस्तानशी संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. ते म्हणाले की, या संदर्भातील ठोस पुरावे ते लवकरच जनतेसमोर मांडतील.

मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की,

यापूर्वीही त्यांनी गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नी एलिझाबेथ कोलबर्न यांच्यावर पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.शी (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स – आंतरसेवा गुप्तचर यंत्रणा) संबंध असल्याचे आरोप केले होते. या आरोपांची चौकशी करण्यासाठी विशेष अन्वेषण पथक स्थापन करण्यात आले होते. या पथकाने गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अन्वेषणाचा अहवाल मुख्यमत्र्यांकडे सादर केला.

सरमा यांच्या म्हणण्यानुसार अन्वेषण पथकाला असे काही तथ्य सापडले आहेत, ज्यामुळे देशाच्या सार्वभौमत्वाशी संबंधित गंभीर प्रश्न उपस्थित होतात. हा संपूर्ण प्रकरण पुढील टप्प्यात केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे सोपवण्यात येणार आहे, जेणेकरून निष्पक्ष चौकशी होऊ शकेल.

गौरव गोगोई यांनी आरोप फेटाळले

खासदार गौरव गोगोई यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्री सरमा करत असलेले आरोप म्हणजे एखाद्या ‘निकृष्ट चित्रपटा’चा भाग असून आसामची जनता हे व्यवस्थित जाणते. त्यामुळे या आरोपांचा काहीही परिणाम होणार नाही.