
१. इतरांना ज्ञान देण्याची तळमळ
‘१ वर्षापूर्वी मी पू. भाऊकाकांना माझ्या साधनेतील अडथळे सांगितले होते. आता एका वर्षाने मी त्यांना भेटणार होते. त्यांनी ‘मागील वर्षी काय बोलणे झाले होते ?’, हे लक्षात ठेवून मी त्यांच्या घरी जाण्यापूर्वी मला सांगण्यासाठी सूत्रे त्रोटकपणे लिहून ठेवली होती. यातून मला त्यांच्यातील ‘प्रीती, इतरांचा विचार करणे आणि स्वतःकडील ज्ञान इतरांना देण्याची तळमळ’, हे गुण शिकायला मिळाले.
२. व्यवस्थितपणा
त्यांनी मला सांगण्यासाठीची सर्व सूत्रे एका छोट्या कागदावर व्यवस्थित लिहून ठेवली होती. सूत्रे सांगून झाल्यावर त्यांनी कागदावरील सर्व सूत्रे परत वाचली आणि ‘त्यांतील कोणते सूत्र सांगायचे राहिले नाही ना ?’, याची निश्चिती केली. त्यांचे लिखाण पाहून मला सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचीच आठवण झाली. गुरुदेव एखाद्याशी बोलत असतांना त्यांच्याकडे कागदावर जशी सूत्रे असतात, तसेच पू. भाऊकाकांचे लिखाण होते.
३. इतरांचा विचार करून तळमळीने शिकवणे

एकदा त्यांनी एक सूत्र सांगण्यासाठी भगवद्गीतेमधील काही श्लोकांचा संदर्भ दिला. त्यांनी मला त्या श्लोकांचा अर्थ सांगितला. मला ते अधिक स्पष्ट होण्यासाठी त्यांनी स्वतः उठून त्यांच्या खोलीतून भगवद्गीता आणली आणि त्यातील तो श्लोक मला दाखवला. ‘मला संस्कृत कळत नाही’, हे कळल्यावर त्यांनी दुसरी भगवद्गीता आणली. त्यामध्ये श्लोकांचा अर्थ हिंदीत दिला होता.
४. सेवा परिपूर्ण करण्यास शिकवणे
त्यांनी मला मार्गदर्शनातील सूत्रे टंकलिखित करून पाठवण्यास सांगितले होते. दुसर्या दिवशी त्यांनी त्यांच्या सेवेत असणार्या साधिकेकडून एक चिठ्ठी पाठवली आणि त्यात ‘टंकलेखन केलेली धारिका कोणाकडे पाठवायची ?’, हे लिहिले होते. या प्रसंगातून ‘सेवा परिपूर्ण कशी करायला हवी’, हे मला त्यांच्याकडून शिकायला मिळाले.
५. विनम्रता
खरेतर मला पू. भाऊकाकांच्या अमूल्य सत्संगाचा लाभ झाला. त्यांनी मला पुष्कळ वेळ दिला होता; पण शेवटी ते मला म्हणाले, ‘‘मी तुमचा पुष्कळ वेळ घेतला.’’
६. पू. भाऊकाकांच्या मार्गदर्शनामुळे ‘मनाकडे कसे पहावे ?’, याची दिशा मिळणे
काही वेळा माझ्या मनात येणार्या विचारांचा मला त्रास होत असे. ‘माझ्या मनात असे विचार का येतात ?’, असे मला वाटत असे. भूतकाळातील काही विचारांमुळे मला वाटायचे, ‘अशा वाईट विचारांमुळे मला पाप लागत आहे आणि माझी साधना व्यय होत आहे.’ काही वेळा ‘साधकांविषयी तुलना, ईर्ष्या आणि मत्सर’, यांविषयी विचार आल्याने मला त्रास होत असे; पण ‘भगवंत अंतर्यामी आहे’, याची प्रचीती भगवंताने मला पू. भाऊकाकांच्या माध्यमातून दिली. पू. भाऊकाकांनी ‘आपण मनाकडे कसे पहायला हवे ?’, याविषयी मार्गदर्शन केले. त्यातून मला दिशा मिळाली.
‘मला पू. भाऊकाका यांचे चैतन्य आणि सत्संग यांचा लाभ करून घेता येऊ दे अन् त्याप्रमाणे कृती करता येऊ दे’, अशी मी पू. भाऊकाका आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या चरणी प्रार्थना करते.’
– आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे, मंगळुरू, कर्नाटक. (२८.१०.२०२५)
| • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ‘कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तीयोग’ या क्रमाने झालेला आध्यात्मिक प्रवास’ अन् या लिखाणावर श्री. राम होनप यांना सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !