युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांनी आरोप फेटाळला !

नवी देहली – रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी आरोप केला की, २८ आणि २९ डिसेंबरच्या रात्री उशिरा युक्रेनने मॉस्कोच्या नोव्हगोरोड प्रदेशातील पुतिन यांच्या निवासस्थानावर लांब पल्ल्याच्या ड्रोनने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. या आक्रमणासाठी ९१ ड्रोन वापरण्यात आले होते; मात्र हे सर्व रशियाच्या संरक्षण दलांनी रोखले. लावरोव यांनी केलेला हा आरोप युक्रेनने फेटाळून लावला आहे. ‘रशियाचा आणखी एक खोटारडेपणा’, असे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमिर झेलेंस्की यांनी पत्रकारांशी बोलतांना म्हटले.
हे चांगले नाही, मला अतिशय राग आला आहे ! – डॉनल्ड ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी या आरोपावर म्हटले की, तुम्हाला माहिती आहे का ? मला याविषयी कुणी सांगितले ? पुतिन यांनी सकाळीच मला सांगितले की, त्यांच्या निवासस्थानावर आक्रमण झाले; पण हे चांगले नाही. मला अतिशय राग आला आहे.
शांततेच्या प्रयत्नांना हानी पोचवणारी कृती टाळावी ! – पंतप्रधान मोदी यांचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक्स’वर म्हटले की, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानाला लक्ष्य केल्याच्या वृत्तामुळे मी पुष्कळ चिंतेत आहे. संघर्ष संपवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी सध्या चालू असलेले राजनैतिक प्रयत्न हाच सर्वांत यशस्वी होणारा मार्ग आहे. आम्ही संबंधित सर्वांना या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करण्याचे आणि त्या प्रयत्नांना हानी पोचवणारी कोणतीही कृती टाळण्याचे आवाहन करतो.
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
वर्ष २०२२ मध्ये युक्रेनवर अणूबाँब टाकण्यापासून पंतप्रधान मोदी यांनी पुतिन यांना रोखले होते ! – Polish Minister
Maharashtra ATS Raid : आंतकवादविरोधी पथकाच्या पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये २३ हून अधिक ठिकाणी धाडी !
UK Mandir Auction : ब्रिटनमध्ये लिलावात मंदिराची जागा मुसलमानांना विकली !