मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी अवघी राजकीय कारकीर्द खर्ची घालणार्या ममता बॅनर्जी यांना अचानक धर्मनिरपेक्षतेची आठवण !

कोलकाता (बंगाल) – जेव्हा मी गुरुद्वारात जाते, तेव्हा माझ्यावर टीका करणारे काहीच बोलत नाहीत; पण जेव्हा मी ईदनिमित्त आयोजित कार्यक्रमात जाते, तेव्हा ते माझ्यावर टीका करतात. हे योग्य नाही. माझ्यावर मुसलमानांच्या तुष्टीकरणाचे आरोप होतात; पण मी धर्मनिरपेक्ष आहे आणि माझा सर्व धर्मांवर विश्वास आहे. मला बंगाल आणि भारत यांच्याविषयी प्रेम आहे. हीच आमची विचारसरणी आहे, असे विधान बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी येथे केले. कोलकाता येथील न्यू टाऊनमध्ये श्री दुर्गादेवीला समर्पित असलेल्या ‘दुर्गा आंगण’ या सांस्कृतिक संकुलाच्या भूमीपूजन समारंभात त्या बोलत होत्या.
संपादकीय भूमिकाकेवळ ‘जय श्रीराम’म्हटले म्हणून ममता बॅनर्जी यांनी हिंदूंविरुद्ध गुन्हे नोंदवले आहेत, नवरात्रीत हिंदूंच्या मिरवणुकींना अनुमती नाकारली आहे, धर्मांधांची बाजू घेऊन हिंदूंचे दमन केले आहे. हे सर्व हिंदू कसे विसरतील ? अशा व्यक्तीने ‘मी धर्मनिरपेक्ष आहे’, असे म्हणणे हास्यास्पद आहे ! बंगालमधील आगामी निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून ममता बॅनर्जी अशी विधाने करत आहेत, हे उघड आहे ! |
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न
पुणे येथील येरवडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंजुम बागवान यांच्याकडून हिंदुद्वेषी आणि समाजविघातक कारवाया !