कोल्हापूर येथे हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलनात हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

कोल्हापूर, २६ डिसेंबर (वार्ता.) – बांगलादेशातील हिंदु दीपू चंद्र दास याच्या निर्घृण हत्येनंतर हिंदूंच्या हत्येचे सत्र चालूच आहे. तेथील कट्टरतावाद्यांकडून हिंदूंची घरे आणि दुकाने जाळणे अशा कृती होत असून तेथील हिंदू जीव मुठीत धरून जगत आहेत. तरी या संदर्भात भारताने कठोर भूमिका घेत बांगलादेशावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ (काळजीपूर्वक केलेली सैन्य कारवाई. त्यामुळे लक्ष्य सोडून आजूबाजूच्या परिसराची हानी होत नाही.) करून बांगलादेशाला धडा शिकवावा, अशी एकमुखी मागणी विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने कोल्हापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती चौक (शिवतीर्थ) येथे करण्यात आलेल्या हिंदु राष्ट्र आंदोलनात करण्यात आली. या प्रसंगी भाजपचे श्री. महेश जाधव, ‘हिंदु युवा प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. अशोक देसाई, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. किशोर घाटगे, ‘शिवराष्ट्र धर्म संघटने’चे संस्थापक श्री. दिलीप भिवटे, ‘शिवशाही प्रतिष्ठान’चे संस्थापक श्री. सुनील सामंत, सनातन संस्थेचे डॉ. मानसिंग शिंदे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांनी केले.

या प्रसंगी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख श्री. उदय भोसले, श्री. अर्जुन आंबी, श्री. कृष्णात यादव, पूजा शिंदे, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे करवीर तालुकाप्रमुख श्री. राजू यादव, श्री. सुरेश धनगर, जुना बुधवार पेठेचे श्री. सुशील भांदिगरे, ‘हिंदु महासभे’चे श्री. प्रशांत पाटील, विश्व हिंदु परिषदेचे जिल्हामंत्री श्री. विनय बारड, श्री. सतीश मांगले, उद्योजक श्री. योगेश केसरकर, हिंदुत्वनिष्ठ सौ. सविता कांबळे, सर्वश्री आनंदराव काशीद, नितीन काकडे, प्रतीक हजारे, जयवंत ठक्कर, मनोजकुमार चौगुले, कैलास दीक्षित, हिंदु महासभेचे श्री. रमेश भोरे, ‘श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यासा’चे राष्ट्रीय महामंत्री श्री. पराग फडणीस, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री विजय गुळवे, विजय चौगुले, अवधूत चौगुले, मंदिर महासंघाचे श्री. अशोक गुरव आणि श्री. आप्पासाहेब गुरव यांसह विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे प्रतिनिधी अन् कार्यकर्ते उपस्थित होते.
आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आले.
शिरोळ येथे तहसीलदारांना निवेदन !
शिरोळ (जिल्हा कोल्हापूर) – याच मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिरोळ येथे तहसीलदार अनिलकुमार हेळकर यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. भगवंतराव जांभळे, भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. राजेंद्र दाईंगडे, व्यापारी महासंघाचे श्री. निर्मल पोरवाल, श्री स्वामी समर्थ संप्रदायाचे श्री. रवींद्र महात्मे, हिंदुत्वनिष्ठ श्री. गजानन आणुरे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. संजय घाटगे उपस्थित होते.
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
ढवळी परिसरात बिबट्याचे आक्रमण
मळेवाड येथे बिबट्याच्या आक्रमणात वासराचा मृत्यू
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
अत्याचार केल्याप्रकरणी धर्मांधाला सश्रम कारावास आणि दंड !
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज