दोघांची प्रकृती गंभीर !

नाशिक – जिल्ह्यातील बागलाणमधील जुनी शेमळी येथील ७ जण गावठी हातभट्टीचे मद्य पिण्यासाठी २४ डिसेंबर या दिवशी अज्ञातस्थळी गेले; मात्र मद्याच्या अतीसेवनामुळे त्यांना विषबाधा होऊन ते बेशुद्ध पडले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात भरती केले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. (गावठी हातभट्टीचे मद्य बनवण्याच्या ठिकाणांची माहिती पोलिसांच्या गुप्त विभागाला कशी मिळत नाही ? – संपादक)
अमृत जगताप (वय ४३ वर्षे), साजन लोंढे (वय ३० वर्षे), प्रवीण पवार (वय ३५ वर्षे), राहुल पवार (वय ३२ वर्षे), अजय पवार (वय ४० वर्षे), शरद पवार (वय ५२ वर्षे), योगेश पगारे (वय ४२ वर्षे) अशी ७ जणांची नावे आहेत. जुनी शेमळीत २ वर्षांपूर्वी मद्यबंदीचा ठराव केला होता; मात्र बाहेरून मद्य आणून येथे छुप्या पद्धतीने विक्री केली जाते.
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !