|

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळमध्ये नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल घोषित झाले. त्यानंतर झालेल्या शपथविधीच्या कार्यक्रमात माकपच्या एका नगरसेविकेने शपथ घेऊन ‘जय हिंद’ असे म्हटल्यानंतर क्षमा मागितली. या क्षमायाचनेवर भाजपने तीव्र अप्रसन्नता व्यक्त केली असून केरळमधील भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी याला ‘भीतीचे वातावरण’ असे संबोधले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, देशप्रेम व्यक्त केले, तरी शिक्षा आणि सार्वजनिक अपमान सहन करावा लागतो.
Kerala: A corporator from the ruling CPI (Marxist) apologised for saying “Jai Hind” after the oath – fearing party backlash!
The BJP slammed the incident.
When patriotism needs an apology, it exposes the authoritarian mindset of CPM.
Those branding Hindus as “Talibani” reveal… pic.twitter.com/KO1qchF8Z6
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 24, 2025
नेमका काय वाद आहे ?
थिरूवनंतपूरम् येथील कुरक्कन्नी प्रभागातून निवडून आलेल्या अखिला जी.एस्. यांनी शपथ घेतल्यानंतर आनंद व्यक्त करतांना ‘जय हिंद’ म्हटले; मात्र असे म्हटल्यावर त्या अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी क्षमायाचना केली. त्यानंतर माकपच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना धीर दिला आणि ‘देशावर प्रेम करणारा कोणताही नागरिक हा घोष उच्चारू शकतो’, असे सांगितले.
An elected LDF councillor in Kerala apologizes for saying Jai Hind right after taking an oath to protect and uphold the Constitution 🇮🇳
Let that sink in.
This is the culture of fear the Left has created where even expressing love for the nation invites punishment, intimidation,… pic.twitter.com/Uc9UN3BYIK
— Rajeev Chandrasekhar 🇮🇳 (@RajeevRC_X) December 23, 2025
केरळमधील भाजपचे नेते राजीव चंद्रशेखर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले की, ही घटना ‘डाव्यांनी निर्माण भीती निर्माण केली आहे’, हे दर्शवते. येथे देशप्रेम व्यक्त केले, तरी धमकी आणि अपमान सहन करावा लागतो. माकप आणि तिची इंडी आघाडीतील सहकारी काँग्रेस सहनशीलतेवर भाषण करतात अन् भाजपला ‘असहिष्णु’ म्हणतात.
संपादकीय भूमिकासाम्यवादी माकपची सत्ता असणारे केरळ भारतात नसून चीनमध्ये असल्याचेच दर्शवणारी ही घटना आहे ! हिंदूंना ‘तालिबानी’ म्हणणारे माकपवाले स्वतः किती हुकूमशाही आणि शहरी नक्षलवादी विचारांचे आहेत, ? हे यावरून लक्षात येते ! |
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले