Mumbai Demographic Alert : मुंबईत वर्ष २०५१ पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या ३० टक्क्यांहून अधिक होईल ! – TISS Report

  • ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या अहवालातील माहिती

  • बांगलादेशी मुसलमान घुसखोरांच्या संख्येमुळे होणार पालट

मुंबई – मुंबईत लोकसंख्येची रचना झपाट्याने पालटत असल्याचे चित्र समोर आले आहे. येथे मुसलमानांची लोकसंख्या वाढत असल्याची माहिती ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’, म्हणजेच ‘टी.आय.एस्.एस्.’ या नामांकित संस्थेच्या अहवालात देण्यात आली आहे. या अहवालानुसार बांगलादेशामधून होणार्‍या घुसखोरीमुळे मुंबईचा सामाजिक नकाशाच पालटत चालला आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान घुसखोरांची संख्या इतक्या प्रमाणात वाढते आहे की, वर्ष २०५१ पर्यंत शहरातील लोकसंख्येचे संतुलन पूर्णपणे पालटू शकते, असे नमूद करण्यात आले आहे.

१. टी.आय.एस्.एस्.च्या मते वर्ष १९६१ मध्ये मुंबईतील मुसलमानांची लोकसंख्या अनुमाने ८ टक्के होती, जी वर्ष २०११ मध्ये २१ टक्क्यांवर पोचली. हाच प्रवाह कायम राहिला, तर वर्ष २०५१ पर्यंत हा वाटा ३० टक्क्यांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

२. मुंबईत अवैधरित्या रहाणारे काही बांगलादेशी घुसखोर येथे कमावलेला मोठा भाग परत बांगलादेशात पाठवत असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

हिंदूंच्या लोकसंख्येचा टक्का ५४ पेक्षा खाली जाण्याची शक्यता !

यापूर्वी नोव्हेंबर २०२४ मधील अंतरिम अहवालातही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची वाढती संख्या शहराच्या सामाजिक अन् आर्थिक आराखड्यावर परिणाम करत असल्याचे नमूद करण्यात आले होते. बांगलादेश आणि म्यानमार येथून होणारी अवैध स्थलांतरितांची वाढ राजकीय लाभासाठी वापरली जात असल्याचेही नमूद केले होते. त्यानुसार वर्ष २०५१ पर्यंत मुंबईतील हिंदूंची लोकसंख्या ५४ टक्क्यांपेक्षा खाली येण्याची आणि मुसलमान लोकसंख्या जवळपास ३० टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

केवळ मुंबईतच नाही, तर संपूर्ण देशात मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे आणि येत्या जनगणनेतून याची स्थिती स्पष्ट  होणार आहे. वर्ष २०४७ पर्यंत लोकसंख्येच्या आधारे भारताला ‘इस्लामी देश’ बनवण्याचे रचले गेलेले षड्यंत्र यापूर्वीच उघड झाले आहे. त्यामुळे हिंदूंना त्यांचे अस्तित्व टिकवायचे असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापन करण्याविना पर्यायच नाही !