‘धुरंधर’ चित्रपटाचे ‘साळींदर विरोधक’ आणि ‘अत्यंत हुशार प्रेक्षक’ !

५ डिसेंबर २०२५ या दिवशी ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लगेचच बिळात लपलेले ‘सेक्युलर’वादी (निधर्मीवादी) स्वतःचे साळींदरासारखे वैचारिक काटे समाजमनात घुसवायला कार्यरत झाले. या वृत्तीवर मात करण्यासाठी हिंदु समाजाने अत्यंत हुशार होणे आवश्यक आहे. त्याविषयी ऊहापोह करणारा हा लेख श्री गुरुचरणी अर्पण करत आहे.

२३ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘साळींदर वृत्ती’ म्हणजे काय ?, ‘धुरंधर’ चित्रपट कसा आहे ? आणि ‘धुरंधर’ चित्रपटाविरुद्ध पोटशूळ उठण्याची महत्त्वाची ३ कारणे’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहोत.

संकलन : श्री. सागर निंबाळकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१८.१२.२०२५)

(उत्तरार्ध)

लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा – https://sanatanprabhat.org/marathi/989503.html

धुरंधर चित्रपटाचे भित्तीपत्रक

३. हिंदूंनी या साळींदरांना ‘बिलंदर’पणे, म्हणजे अत्यंत हुशारीने कोणती उत्तरे द्यावीत ?

३ इ. कथित अभिनेत्री राधिका आपटे म्हणाल्या, ‘‘अशा चित्रपटांमुळे हिंसात्मक प्रचारास मिळत असलेल्या प्रतिष्ठेला मी घाबरले आहे.’’

उत्तर : मुळात राधिका आपटे यांना अभिनेत्री मानायचे का ? हा प्रश्न आहे; कारण त्यांनी अंगप्रदर्शन करून समाजात विकृती पसरवणार्‍याच अनेक भूमिका केल्या आहेत. ‘सिस्टर मिडनाईट’ या चित्रपटात राधिका यांचे पात्र जिवंत पक्ष्यांना दातांनी चावून मारत असतांना दर्शवले आहे. मारलेल्या पक्ष्यांनाच कागदात गुंडाळून एका खणात साठवण्यासारखे चित्रीकरण करतांना राधिका यांना भीती वाटली नाही का ?

३ ई. पाकचा हस्तक असल्याचा संशय असलेला ध्रुव राठी म्हणतो, ‘‘यातील कठोर हिंसेला मनोरंजन म्हणणे योग्य नाही.’’ त्याने या चित्रपटातील दृश्यांची तुलना आतंकवादी संघटना ‘इसिस’च्या लघुपटांशी केली.

उत्तर : इस्लामच्या नावाखाली चालू असलेल्या हिंसाचाराचे या चित्रपटात वास्तववादी दर्शन आहे, जे केवळ आणि केवळ ‘आत्यंतिक हिंसा’, ‘नृशंस हिंसा’, ‘निर्घृण अत्याचार’ या संज्ञांखालीच येऊ शकते. तसेच हा चित्रपट केवळ मनोरंजनासाठी नाही, तर राष्ट्रप्रेमाच्या बीजरोपणासाठी आहे. ‘इसिस’च्या लघुपटांशी तुलना करून ध्रुव राठी यांनी त्यांची वैचारिक दिवाळखोरीच स्पष्ट केली आहे.

श्री. सागर निंबाळकर

४. ‘धुरंधर’ने काय साध्य केले ?

४ अ. स्वातंत्र्यानंतर ‘सेक्युलरवादा’च्या नावाखाली इतिहासद्रोही आणि हिंदूद्रोही चित्रपटांची निर्मिती ! :  स्वातंत्र्यानंतर भारतात चित्रपट नावाची एक सुप्त सत्ता अत्यंत सुनियोजितपणे सेक्युलरवादाच्या बुरख्याखाली धर्मांध मुसलमानांच्या हितासाठी कार्यरत झाली. त्यांनी हिंदूंपासून त्यांचे पौरुषत्व, वीरत्व, क्षात्रतेज, धर्मतेज, श्रद्धा यांचे हरण करण्याचे षड्यंत्र चालवले. त्याची काही प्रातिनिधिक उदाहरणे येथे देत आहे.

१. ‘मोगल-ए-आजम’, ‘ताजमहल’ यांसारख्या चित्रपटांद्वारे धर्मांध मुसलमान राजांचे उदात्तीकरण करून खोटा इतिहास प्रसारित केला.

२. नायकाला कणखर वा राष्ट्रप्रेमी असा न दाखवता प्रेयसीच्या मागे पळणारा, प्रेयसीच्या पदराखाली रडणारा, भावनाशील, अहिंसावादी दाखवण्यात आले.

३. सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी ‘दिवार’सारख्या चित्रपटात नास्तिक नायकाची ‘७८६’ या अंकावर मात्र श्रद्धा दाखवली. अशा अनेक क्लुप्त्या लढवून त्यांनी हिंदूंना अपकीर्त केले आणि धर्मांध मुसलमानांचे उदात्तीकरण केले.

४. ‘पीके’सारख्या चित्रपटात हिंदु संत खाेटारडे दाखवतांना ‘लव्ह जिहाद’चे उदात्तीकरण केले.

५. राष्ट्रप्रेम दर्शवण्याच्या नावाखाली क्रांतीकारकांवर चित्रपट बनवतांना यांनी मंगल पांडेंना महिलेसह जलक्रीडा करतांना दाखवून अवमान केला.

६. गुप्तहेरांचे चित्रपट बनवतांना यातील नायक बलदंड शरिराचा पण ‘स्टाईलीश’ दाखवला. महिलांना नगण्य कपडे घालायला लावले. त्यातूनही महिलांच्या कपड्यांच्या रंगांचा वापर हिंदूविरोधी प्रचारासाठी केला.

७. ‘जवान’ चित्रपटात मोठमोठे पूल कोसळतात; मात्र त्या धुमश्चक्रीत नायक मात्र जिवंत रहातो. ‘शहेनशाह’ चित्रपटात लोकांच्या साहाय्यासाठी अज्ञात पोलीस अधिकारी येऊन साहाय्य करून जातो. यांसारख्या स्वप्नरंजक गोष्टी चित्रपटांत पेरून वास्तवापासून लोकांना दूर ठेवण्यात आले.

४ आ. ‘धुरंधर’मध्ये ‘सेक्युलर’वादाला तिलांजली ! : काही वर्षांपूर्वी आलेल्या ‘उरी’, ‘द कश्मीर फाईल्स’, ‘द ताश्कंद फाईल्स’ यांसारख्या चित्रपटांनी वर दिलेले सगळे सेक्युलरवादी मापदंड मोडण्यास प्रारंभ केला. त्यांपैकी एक प्रमुख ठरावा, असा ‘धुरंधर’ चित्रपट आहे.

१. ‘धुरंधर’ चित्रपटाने वीरत्वाचे दर्शन घडवले. कोणताही आडपडदा न ठेवता, धर्मांधांचे विद्वेषी संवाद अन् कृती जशाच्या तशा दाखवल्या अन् सेक्युलरवादाला मूठमाती दिली.

२. ‘देशासाठी जीवन समर्पित करणे, हे अभिमानास्पद असते.’ ‘शत्रूच्या गोटात गेल्यानंतर संयम, संधीसाधूपणा हेच तुमचे मुख्य शस्त्र असते आणि ते नाही वापरले, तर तुमच्या प्राणांवर बेतते.’ ‘राष्ट्रविजयासाठी भावनाशीलतेला थारा नसतो.’ यांसारखे अनेक राष्ट्रप्रेमी संदेश हा चित्रपट कोणताही गाजावाजा न करता देतो. त्यामुळे ‘कुख्यात गुंड दाऊदप्रेमी बॉलिवूड’करांच्या आजपर्यंत केलेल्या अपप्रचाराला (‘फेक नरेटिव्ह’ला) सुरुंग लागला.

३. या चित्रपटाने सहजपणे ६५० कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न प्राप्त केले. त्यामुळे ज्या ‘खाना’वळीच्या (खान आडनावाच्या अभिनेत्यांच्या) चित्रपटांचे उत्पन्न चित्रपटगृहे रिकामी असूनही ३००-४०० कोटींपर्यंत दर्शवले जात होते आणि त्या माध्यमातून ‘काळा पैसा पांढरा करण्या’चे राष्ट्रविरोधी षड्यंत्र चालवण्यात आले, ते उद्ध्वस्त झाले आहे.

परिणामी सेक्युलरवादी सटपटले. काँग्रेसच्या पैशांवर पोसले जाणारे चित्रपट समीक्षक बावचळले. त्यांनी या चित्रपटाला विरोध केला; मात्र अत्यंत हुशार प्रेक्षकांनी त्यांचे काहीएक चालू दिले नाही.

लोकहो, आज ‘धुरंधर’ चित्रपटाने जागृत केलेले राष्ट्रप्रेम तेवत ठेवणे, हे आपले कर्तव्य आहे. ‘धुरंधर’मधील वीरवृत्ती आपणही प्रत्यक्ष जीवनात उतरवायला हवी. त्यासाठी तुम्हाला कुठेही धर्मांधांच्या संशयास्पद कृती आढळल्या, तर त्याची माहिती स्थानिक पोलिसांना द्या ! देहलीत स्फोट घडवणार्‍या धर्मांध डॉक्टरांप्रमाणे कुणी आढळल्यास त्याविषयी अन्वेषण यंत्रणांना कळवा ! कुठेही प्रवास करतांना सतर्क रहा ! तुमची एक कृती देशावरील आघात वाचवण्यास साहाय्यभूत ठरू शकते, हे लक्षात घ्या !

चला तर, स्वधर्म आणि राष्ट्र यांच्याप्रती कृतज्ञ राहून त्यांच्या उत्कर्षासाठी कार्यरत होऊया ! त्यासाठी आपल्याला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्था करत असलेल्या हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याची सुवर्णसंधी आहे ! ती साधा आणि स्वजन्माचे कल्याण करून घ्या ! तसे करण्याची सद्बुद्धी प्रत्येक वाचकाला व्हावी, ही श्री गुरुचरणी प्रार्थना !

।। श्रीकृष्णचरणार्पणमस्तु ।।

संपादकीय भूमिका

खोटा इतिहास वगळू न देणारे आणि सत्य इतिहास मांडू न  देणारे साम्यवादी हेच खरे इतिहासद्रोही आहेत, हे जाणा !