(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांनी डोके आणि मान झाकण्यासाठी वापरलेले वस्त्र)

पाटलीपुत्र (बिहार) – शहरात नियुक्तीपत्रांचे वाटप करत असतांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी एका महिला डॉक्टरचा हिजाब काढण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने नितीश कुमार यांना पठिंबा दिला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हरिभूषण ठाकूर बचौल यांनी म्हटले आहे की, सार्वजनिक ठिकाणी आणि सरकारी नोकर्या येथे हिजाबवर बंदी घालण्यात यावी. यासह हिजाबवर पूर्ण भारतात बंदी घातली पाहिजे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनीही नितीश कुमार यांना पाठिंबा देत म्हटले की, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी कोणतीही चूक केली नाही. भारत हा काही इस्लामी देश नाही. भारतात कायद्याचे राज्य आहे. नितीश कुमार यांनी योग्यच केले.
“Wearing Hijab in Public Should Be Banned in India!” — Haribhushan Thakur Bachaul, BJP Leader (See Video)
In a related development, Union Minister Giriraj Singh backed Nitish Kumar in the hijab incident, saying: “India is not an Islamic country; it follows the rule of law.”
The… pic.twitter.com/XkvDKfrNSm
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 19, 2025
हरिभूषण ठाकूर बचौल म्हणाले की,
१. हिजाबच्या नावाखाली केवळ आतंकवाद फोफावत आहे. आतंकवादी आक्रमणे करून आतंकवादी हिजाब घालून पळून जातात. ज्यांना हिजाब घालायचा आहे, त्यांनी पाकिस्तानात जावे.
२. हिजाब घालून नियुक्तीपत्र घेण्यासाठी आलेल्या महिला डॉक्टरने बिहार सोडले पाहिजे. ती चेहरा लपवून नियुक्तीपत्र घेण्यासाठी गेली होती.
(म्हणे) ‘हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद भडकवण्याचा प्रयत्न ! – राष्ट्रीय जनता दल
बचौल यांच्या वक्तव्यानंतर बिहारमधील वातावरण तापले आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते मुकेश कुमार रोशन यांनी बचौल यांच्यावर निशाणा साधत म्हटले की, ते हिंदू आणि मुसलमान यांच्यात वाद भडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना तात्काळ अटक करा.
काँग्रेसच्या हुकूमशाहीचा इतिहास आता एन्.सी.ई.आर्.टी.च्या विद्यार्थ्यांसमोर !
Ram Mandir Donation Case : श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणी अंततः गुन्हा नोंद : २ जणांना अटक
Seelampur Murder : देहलीतील मुसलमानबहुल सीलमपूरमध्ये १६ वर्षांच्या हिंदु मुलाची मुसलमानांकडून निर्घृण हत्या
Love Jihad : गेल्या २४ घंट्यांत उघड झाल्या लव्ह जिहादच्या ३, तर धर्मांतराची १ घटना !
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !