बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलेचा हिजाब काढल्याच्या घटनावर पाकचे विधान
(हिजाब म्हणजे मुसलमान महिलांचे डोके आणि मान झाकण्याचे वस्त्र)
(नकाब म्हणजे चेहरा झाकण्याचे जाळी असलेले वस्त्र)
(बुरखा म्हणजे संपूर्ण शरीर झाकण्याचे वस्त्र)

इस्लामाबाद (पाकिस्तान) : एका वरिष्ठ नेत्याने मुसलमान महिलेचा बलपूर्वक हिजाब काढणे अत्यंत चुकीचे आहे. भारतात मुसलमान समुदायाविरुद्ध द्वेष वाढत आहे. अशा घटनांमुळे भारतात मुसलमान महिलांच्या अपमानाला सामान्य बनवण्याचा धोका निर्माण होतो. तसेच मुसलमानांबद्दल असहिष्णुतेला प्रोत्साहन मिळते, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहीर हुसेन अंद्राबी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
Pakistan lectures India on “Muslim hatred” over CM Nitish Kumar’s hijab-related incident.
But who will answer for 78 years of Hindu genocide in Pakistan?
Hindus fell from 14% (1947) to ~1% today. When will Pakistan speak on this?
When will India demand answers?
Like the West,… pic.twitter.com/Sche5ecdVs
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 19, 2025
बिहारमध्ये आयुष डॉक्टरांना नियुक्तीपत्र वाटप करतांना मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिला डॉक्टर नुसरत यांना हिजाबबद्दल विचारले आणि नंतर स्वतः त्यांचा हिजाब काढला होता. यावरून पाकने वरील प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यापूर्वी पाकमधील कुख्यात गुंड भाटी यानेही नितीश कुमार यांना धमकी दिली होती. त्यानंतर नितीश कुमार यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
बांगलादेशी घुसखोरांचे निर्वासन आणि भारताची सुरक्षा !
बलुचिस्तानच्या स्वातंत्र्यासाठी लढणार्यांना मिळत आहे इस्रायली यंत्रणांचे साहाय्य
ट्रम्प यांनी हॉर्मुझच्या सामुद्रधुनीवरील २० टक्के शुल्क मागे घेतले
पाकिस्तानी क्रिकेटपटू भारताच्या दौर्यावर असतांना करत होते अमली पदार्थांची तस्करी ! – R. V. S. Mani
Telangana AI Training : तेलंगाणातील काँग्रेस सरकार ८० सहस्र अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना एआय आणि डिजिटल सुरक्षा यांचे विनामूल्य प्रशिक्षण देणार !