GPS Tagged Chinese Seagull : कारवार (कर्नाटक) किनारपट्टीवर चिनी संस्थेशी संबंधित घायाळ सीगल पक्षी सापडला

  • पक्षावर लावण्यात आलेले होते जी.पी.एस्. ट्रॅकर

  • कारवारमध्ये भारतीय नौदलाचे तळ, विमानवाहू नौका विक्रांतचा तळ आणि जवळच अणूप्रकल्प असल्याने भारत सतर्क

(जी.पी.एस्. म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम. एखादी वस्तू, वाहन किंवा व्यक्ती यांचे स्थान निश्चित करण्यासाठी आणि त्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह सिग्नलचा वापर करणारे उपकरण)

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकाच्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील कारवार किनारपट्टीवर जी.पी.एस्. ट्रॅकर  लावलेला सीगल पक्षी घायाळ अवस्थेत सापडला आहे. हा पक्षी चिनी संशोधन संस्थेशी संबंधित असल्याचे प्राथमिक अन्वेषणात समोर आले असून यामुळे स्थानिक नागरिक आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली आहे. या किनारपट्टीवर भारताचे नौदलाचे तळ आहे. येथे भारतीय विमानवाहू नौका ‘विक्रात’ उभी असते. तसेच येथून जवळच कैगा अणूउर्जा प्रकल्प आहे. यामुळे या घटनेचे गांभीर्य वाढले आहे.

कारवारमधील रवींद्रनाथ टागोर समुद्रकिनार्‍यावर सागरी तटरक्षक दलाच्या पोलिसांना हा घायाळ सीगल पक्षी आढळला.

संपादकीय भूमिका

चीनच्या कुरापती पहाता या घटनेची सर्वच अंगांनी चौकशी करणे आवश्यक !