Shankhnad Mahotsav Delhi : ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ला प्रसारमाध्यमांचा भरघोस प्रतिसाद !

  • ७८ प्रतिनिधी उपस्थित !

  • धर्मेण जयति राष्ट्रम् ।’वर व्हिडिओ प्रदर्शित !


‘धर्मेण जयति राष्ट्रम् ।’ हे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे घोषवाक्य आहे/ ‘धर्मेण जयति राष्ट्रम्’ हा व्हिडिओ ‘मुव्हिंग पिक्सेल’द्वारे प्रकाशित करण्यात आला आहे. याचे संस्थापक मनीष बार्डिया आहेत. व्हिडिओच्या लेखिका आणि या आस्थापनाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली शहा आहेत, तर त्यात विचार प्रकट करणारी त्यांची मुलगी हीर शहा आहेत. हा उत्कृष्ट व्हिडिओ बनवून त्याचे प्रभावी प्रसारण करणार्‍या संपूर्ण पथकाचे आयोजकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांनी पाच पातशाह्यांचा पराभव करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्या महानायकाच्या जीवनावर आधारित प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन या व्हिडिओमध्ये करण्यात आले आहे.

शंखनाद महोत्सवासाठी ‘एबीपी लाईव्ह’, ‘एबीपी न्यूज’, ‘टाइम्स नाऊ’, ‘रिपब्लिक भारत’, ‘सी.एन्.एन्. आय.बी.एन्.’, ‘न्यूज १८’ यांसारख्या प्रसिद्ध वृत्तवाहिन्या आणि वृत्तपत्रे असे मिळून ७८ प्रतिनिधी वार्तांकन आणि विशेष वार्तांकन (स्पेशल स्टोरी) करण्यासाठी १३ डिसेंबरला आले होते. ‘रिपब्लिक भारत’ वाहिनीने महोत्सवाचे त्यांच्या ‘डिजिटल’ वाहिनीवरून थेट प्रक्षेपण केले.

शस्त्रप्रदर्शन पहाण्यासाठी अवश्य या ! – स्वामी दीपांकर

स्वामी दीपांकर

प्रसिद्ध भिक्षा यात्रेचे प्रणेते स्वामी दीपांकर यांनी शस्त्रप्रदर्शनाला भेट दिली. ते म्हणाले की, हे शस्त्रप्रदर्शन पाहून अंगावर रोमांच उभे राहिले. शस्त्रप्रदर्शन पाहून आपल्याला पूर्वजांविषयी सार्थ अभिमान वाटेल, तसेच जीवनाला पुढील दिशा मिळेल. हे प्रदर्शन पहाण्यासाठी तुम्ही अवश्य या !

(स्वामी दीपांकर यांनी वर्ष २०२२ मध्ये गावोगावी भ्रमण करून ‘जातीय बंधने तोडून सनातनी हिंदु म्हणून एकत्र येण्याची भिक्षा मला द्यावी’, असे आवाहन हिंदूंना केले. जवळपास १ वर्ष ते यासाठी भ्रमण करत होते.)

वैशिष्ट्यपूर्ण – महोत्सवाच्या स्थळी एका प्रवेशद्वारावर काळ्या रंगाचा श्वान आला होता. त्याच्या माध्यमातून श्री काळभैरव देवाने दर्शन देऊन आशीर्वाद दिल्याचे एका साधकाला जाणवले.