France 24 Media : (म्हणे) ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवून मुसलमानांना लक्ष्य केले जात आहे !’

फ्रान्सच्या ‘फ्रान्स २४’ या वृत्तसंकेतस्थळावरील संपादकीयमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरून हिंदुत्वनिष्ठांवर टीका

नवी देहली – फ्रान्सच्या ‘फ्रान्स-२४’ या वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संपादकीयमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा तेलंगाणा येथे बसवण्यात आलेल्या पुतळ्यावरून हिंदुत्वनिष्ठांवर टीका करण्यात आली आहे. ‘इंडियाज हिंदु नॅशनलिस्टस टेक १७ सेंच्युरी किंग ॲस न्यू अँटी मुस्लिम सिंबॉल’ (भारताच्या हिंदु राष्ट्रवाद्यांनी १७ व्या शतकातील एका राजाला मुसलमान विरोधाचे नवीन प्रतीक बनवले आहे) या शीर्षकांतर्गत हे संपादकीय प्रसिद्ध करण्यात आले आहे. या संपादकीयमध्ये कोणत्याही लेखकाचे नाव नाही.

या पुतळ्याच्या स्थापनेविषयी ३१ मे या या दिवशी एका अमेरिकी वृत्तपत्रात लेख प्रसिद्ध झाला. ज्यामध्ये लिहिले होते की, आजच्या भारतात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे स्थापित करण्याचा एक नवीन प्रथा चालू झाली आहे.

संपादकीयमध्ये काय लिहिले गेले ?

या संपादकीयमध्ये लिहिले गेले आहे की, भारतात अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे बसवले जात आहेत. २९ मे २०२६ या दिवशी सामाजिक माध्यमांवर एक माहिती प्रसारित करण्यात आली होती की, तेलंगाणाच्या संगारेड्डी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापित करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे उभारन भारताच्या मुसलमान समुदायाला लक्ष्य केले जात आहे.

संपादकीय भूमिका

  • फ्रान्समध्ये मुसलमान स्थलांतरितांच्या समाजविघातक कारवायांमुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. अशांना वठणीवर कसे आणायचे ?, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले. त्यामुळे ‘आतंकवाद कसा संपवायचा असतो ?’, याची प्रेरणा घेण्यासाठी भारतसह फ्रान्समध्येही छत्रपती शिवरायांचे जागोजागी पुतळे उभारणे आवश्यक ! मात्र निधर्मीवादाची झापडे लावलेल्यांना हे काय कळणार ?
  • छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्याचारी ५ मुसलमान पातशाह्यांच्या विरोधात लढून हिंदवी स्वराज्य स्थापन केले. हा इतिहास आहे. असे असतांना जाणीवपूर्वक भारतीय आणि विदेशी हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे नेहमीच छत्रपतींसारख्या महान राष्ट्रपुरुषांवर टीका करत असतात, त्यातलाच हा एक प्रकार आहे !