लाहोर (पाकिस्तान) – पाकिस्तानमध्ये सध्या संस्कृत मंत्रांचा उच्चार ऐकू येत आहे. ‘लाहोर युनिव्हर्सिटी ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’ या संस्थेने ३ महिन्यांच्या संस्कृत कार्यशाळेनंतर आता संस्कृतचा औपचारिक अभ्यासक्रम चालू केला आहे. या कार्यशाळेत विद्यार्थी आणि व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. संस्कृत व्याकरणापासून ते पुराणपरंपरेपर्यंत विविध अंगांवर चर्चा झाली. पाकिस्तानमध्ये स्वातंत्र्यानंतर प्रथमच अशा स्वरूपाचे संस्कृत अध्ययन झाले. या प्रतिसादानंतर विद्यापिठाने हा अभ्यासक्रम प्रारंभ केला. पुढील टप्प्यात रामायण आणि महाभारत यांवर संशोधन प्रारंभ करण्याची सिद्धता आहे.
विद्यापीठ स्तरावर औपचारिक अभ्यासक्रम
कार्यशाळेनंतर विद्यापिठाने नियमित संस्कृत अभ्यासक्रम प्रारंभ केला आहे. या अभ्यासक्रमातील प्रवेश मर्यादित असला, तरी वर्ष २०२७ मध्ये प्रवेशसंख्या वाढवण्याची योजना आहे. पुढील काळात हा अभ्यासक्रम संस्कृत डिप्लोमा (कमी कालावधीचा अभ्यासक्रम) स्वरूपातही शिकवण्याचा मानस आहे.
रामायण, गीता आणि महाभारत यांच्या अभ्यासाला दिशा मिळणार
लाहोरमधील गुरमानी केंद्राचे संचालक डॉ. अली उस्मान कासमी यांच्या मते आगामी १० ते १५ वर्षांत पाकिस्तानमधून संस्कृत, गीता आणि महाभारत विषयांत संशोधन करणारे विद्वान घडतील. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून प्राचीन साहित्याच्या अभ्यासाला नवी दिशा मिळेल.
संस्कृत आणि वेद यांच्या अध्ययनाचे महत्त्व
डॉ. कासमी यांच्या मते या भूभागातच वेदांची निर्मिती झाल्याचे अनेक इतिहासकार मानतात. त्यामुळे संस्कृत आणि वेद यांचे अध्ययन पाकिस्तानसाठी अत्यावश्यक आहे. सध्या पंजाबी, पश्तो, सिंधी, बलुची, अरबी आणि फारसी या भाषा शिकवल्या जातात आणि संस्कृत अनेक शब्दांची मूळ भाषा आहे. संस्कृतमुळे संपूर्ण भाषिक परिसंस्था अधिक सक्षम होते.
संस्कृत पांडुलिपींचा मौल्यवान संग्रह
विद्यापिठात संस्कृतच्या प्राचीन पांडुलिपी (हस्तलिखित प्रती) जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. वर्ष १९३० च्या दशकात विद्वान जे.सी.आर्. वूलनर यांनी ताडपत्रांवर या पांडुलिपी संकलित केल्या; मात्र वर्ष १९४७ नंतर त्यांचा अभ्यास झाला नव्हता. आता नव्याने संशोधनाची प्रक्रिया प्रारंभ होण्याची शक्यता आहे.

संपादकीय : क्रिकेट आणि ‘हायब्रिड’ युद्ध !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
Maharashtra Hostel Scam : बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Oil purchase from Russia : रशियाकडून तेलखरेदी करणार्या भारतासह ५ देशांवर अमेरिका लादणार १०० टक्के शुल्क !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Russia Ukraine War : युक्रेनकडून रशियाच्या २० नौकांवर आक्रमण !