
संगमनेर (अहिल्यानगर) – सारोळेपठार (संगमनेर) येथील आदिवासी महिलेचा २५ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी ५ वाजता पाणी भरण्यावरून शेजारी रहाणार्या जैतून अन्सारी हिच्याशी वाद झाला. या वेळी अन्सारी हिने महिलेला शिवीगाळ केली. रात्री अन्सारी, तिची मुलगी आणि जावई अतीक बशीर शेख यांनी महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत लज्जा उत्पन्न होईल असे गैरवर्तन केले. याविषयी आदिवासी महिलेने तक्रार नोंद करण्यासाठी वारंवार घारगाव पोलीस ठाण्यात चकरा मारल्या; पण पोलिसांनी तक्रार नोंद करून घेण्यास नकार दिला. (अशा पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदवून त्यांना शिक्षा देणे आवश्यक ! असे पोलीस असतील तर महिला कधीतरी सुरक्षित रहातील का ? – संपादक) अखेर हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्यावर पोलिसांनी तिघांविरोधात विविध कलमानुसार गुन्हा नोंद केला. पुढील अन्वेषण घारगाव पोलीस करत आहेत. (हिंदुत्वनिष्ठांनी गुन्हा नोंद झाला म्हणून न थांबता धर्मांधांना कठोर शिक्षा होईपर्यंत त्यांचा पाठपुरावा घ्यायला हवा ! – संपादक)
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !
कराड येथील मूर्तीकारांच्या जागेचा प्रश्न सुटला !
पुणे येथील विश्रांतवाडीत सहस्रो वारकर्यांसाठी अखंड अन्नछत्र