साधुग्राम येथील वृक्षतोड प्रकरण

नाशिक – पार्थ पवारांसारखे तपोवनातील झाडांनाही क्षमा करा. येथील एकाही झाडाच्या फांदीला हात लावता कामा नये, अशी चेतावणी देत मनसे चित्रपट कर्मचारी सेनचे प्रमुख अमेय खोपकर यांनी नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला. या आंदोलनात मनसे प्रभावित विविध कलाकार आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभिनेत्री सायली संजीव या वेळी उपस्थित होती.
अभिनेते संतोष जुवेकर या वेळी म्हणाले की, निसर्गापुढे कुणी मोठे नाही. त्यामुळे सरकारने निर्णय पालटावा.
१५ सहस्र वृक्षारोपणासाठी अयोग्य पद्धतीने खोदले खड्डे
आंध्रप्रदेशाहून ५ फुटांचे वृक्ष नाशिक येथे लावण्यासाठी येणार आहेत. वृक्ष लागवडीसाठी आवश्यक खोली आणि २ खड्ड्यांत येथे योग्य अंतर ठेवलेले नाही. हे लक्षात आल्यावर कुंभपर्व मंत्री गिरीश महाजन यांनी हे खड्डे खोदण्याचे काम थांबवायला सांगितले. त्यांनी उद्यान अधिकार्यांना याविषयी खडसावले.
मुंबईतील आंदोलनातून फहाद अहमद कह्यात !
Delhi Congress Protest : पंतप्रधान मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसचे आंदोलन
जंजिरा दुर्गावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकवा, अन्यथा तीव्र आंदोलन करू ! – ‘सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान’ची चेतावणी !
Stray Dogs Attack : भटक्या कुत्र्याच्या आक्रमणात घायाळ झालेल्या मुलीला १ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश
Allahabad HC : बुलडोझर कारवाईसंदर्भात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या खंडपिठातील न्यायाधिशांचा परस्परविरोधी निकाल !
CJP Protest : ‘न्यायालयाला यात ओढू नका’, असे सांगत तातडीने सुनावणी करण्यास न्यायालयाचा नकार