बाबरीवरून पाक सरकारचा थयथयाट !

इस्लामाबाद (पाकिस्तान) – जागतिक समुदायाने धार्मिक वारसा आणि पवित्र स्थळांचे संरक्षण हे त्यांचे सामूहिक दायित्व मानले पाहिजे. बाबरी मशीदही एक महत्त्वाचे वारसा स्थळ होते. बाबरी मशीद पडल्यानंतर भारतीय मुसलमानांना वेगळे पडल्यासारखे आणि असुरक्षित वाटत आहे. भावनिकदृष्ट्या त्यांनी मोठ्या तणावाचा सामना केला आहे आणि त्यांची स्थिती अजूनही चिंताजनक आहे, असे फुकाचे विधान पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते ताहिर अंद्राबी यांनी बाबरीच्या प्रकरणी केले. (जर भारतातील मुसलमानांना असे वाटत असेल, तर त्यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी पाकमध्ये निघून जावे, नाहीतरी भारताची फाळणी धर्माच्या आधारे झाली होती आणि मुसलमानांसाठी पाकिस्तान देण्यात आले होते ! – संपादक)
🔥 Pakistan’s Double Standards Laid Bare 🔥
“The world should consider the protection of religious heritage sites as its responsibility,” says Pak FO Spokesperson Dr. Tahir Andrabi – all while wailing over Babri Masjid.
Yet in Pakistan, the record is appalling:
How many Hindu… https://t.co/FrseGZRKk5 pic.twitter.com/K2pIX211uf— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 6, 2025
ताहिर अंद्राबी यांनी संयुक्त राष्ट्रांना आवाहन केले की, त्यांनी मुसलमानांच्या धार्मिक वारशांच्या संरक्षणाचे महत्त्व ओळखावे आणि बाबरी मशीद पाडण्यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी साहाय्य करावे.
(म्हणे) ‘अयोध्येत बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सेना ठेवेल !’ – पाकिस्तानी महिला खासदार पलवाशा खान यांचे दिवास्वप्न !

अयोध्येत बांधण्यात येणार्या नव्या बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानची सेना ठेवणार आणि पहिली अजान सैन्यदलप्रमुख असीम मुनीर देतील. आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत, असे विधान पाकिस्तानमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या महिला खासदार पलवाशा जई खान यांनी पाकच्या संसदेत केले. (भारताकडून युद्धात सातत्याने मार खाणार्यांची ही विधाने ऐकून जगही हसत असेल ! – संपादक) त्यांनी पुढे दावा केला की, भारतातील शीख सैनिक पाकिस्तानवर आक्रमण करणार नाहीत; कारण पाकिस्तान गुरुनानक देवांची भूमी आहे. (आतापर्यंत पाकच्या विरोधात झालेल्या युद्धात शीख सैनिक आणि अधिकारी यांनी पराक्रम गाजवलेला आहे, हे खान यांना ठाऊक नाही. यातून त्यांनी बौद्धिक दिवाळखोरी लक्षात येते ! आता शीख सैनिक पाकवर आक्रमण करून ही भूमी पाकच्या कह्यातून मुक्त करून भारताला जोडतील, अशीच स्थिती आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकागेल्या ७८ वर्षांत पाकमध्ये किती मंदिरे पाडून त्यांवर मशिदी बांधण्यात आल्या ? तेथील किती चर्च अन् गुरुद्वारे यांचीही अशी स्थिती झाली, याचेही दायित्व जगाने घेत पाकला जाब विचारला पाहिजे ! |
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक