भाजपकडून विरोध

नवी देहली – राज्यघटनेतील कलम २५ आणि २६ रहित करण्यात आले आहे. देशातील मुसलमानांचे जीवन अधिकाधिक कठीण होत चालले आहे. सुमारे ७० टक्के वक्फ मालमत्ता अजूनही नोंदणीकृत नाही, ज्यामुळे मुसलमानांमध्ये असुरक्षितेची भावना वाढत आहे. (भारतात मुसलमानांमध्ये नव्हे, तर त्यांच्या जिहादी कारवायांमुळे हिंदूंमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. स्वतःला पीडित म्हणून रंगवून जिहादची भाषा करणार्या अशा कट्टरतावादी खासदाराचे सदस्यत्व रहित करणे आवश्यक ! – संपादक) मुसलमान समुदायाला त्याच्या हक्कांसाठी नवीन लढाई लढावी लागू शकते, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे . आम्हाला पुन्हा लढावे लागेल आणि जिहाद करावा लागेल, असे विधान समाजवादी पक्षाचे खासदार मोहिबुल्लाह नदवी यांनी लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनात केले.
🔥 ‘Jihad’ Threat Inside Parliament!
How Much More Will India Tolerate? 🇮🇳⚠️
After Maulana Madani’s “Jihad is sacred” statement, now Samajwadi Party MP Mohibbullah Nadvi threatens to carry out “Jihad” right inside Parliament#ParliamentWinterSession https://t.co/J0jKUs9uqL pic.twitter.com/HtnEZpI1Fw
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) December 5, 2025
समाजवादी पक्षाचे खासदार नदवी यांनी लोकसभेत वक्फ संपत्तीविषयी बोलतांना त्यांनी हे विधान केले. त्यांच्या या विधानावर सभागृहातील सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी तीव्र आक्षेप घेतला आणि त्यांचे वक्तव्य प्रक्षोभक अन् दायित्वशून्य असल्याचे म्हटले. ‘संसदेत ‘जिहाद’सारखे शब्द वापरल्याने समाजात चुकीचा संदेश जातो आणि तणाव वाढतो’, असे सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी म्हटले आहे.
संपादकीय : मंदिरे अध्यात्मासाठीच !
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
जेजुरीतील रसायनयुक्त भंडार्याच्या विक्रीविरुद्ध भाजप आमदार विक्रम पाचपुते आक्रमक !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले