
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याविषयी त्यांची बहीण सौ. सुवर्णा गोगटे यांच्या सासूबाई श्रीमती वर्षा गोगटे (वय ७३ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) यांनी व्यक्त केलेले काव्यमय मनोगत येथे देत आहोत.
उदात्त हेतूने तुम्ही घेतले धर्मप्रसार कार्य हाती ।
तुमच्या योगे अवघ्या विश्वास कळली सनातन धर्ममहती ।। १ ।।
अवतरली जणु सिद्धिलक्ष्मी ही मुद्रा तेजांकित ।
उदंड उत्साह अन् कार्यशक्तीने मति होते कुंठित ।। २ ।।
सकल जनांना सामावून घेता तुम्ही सागरापरी ।
अखंड कृपादृष्टी राहो सर्व साधकांवरी ।। ३ ।।
अचूक नियोजन अन् सामर्थ्याने कार्यसिद्धी होते ।
सत्संगाने तुमच्या मन धन्य धन्य होते ।। ४ ।।
मार्गदर्शन मोलाचे करते तुमची स्नेहमयी दृष्टी ।
जशी माय लेकरावरी करते वात्सल्य प्रेमवृष्टी ।। ५ ।।
अखंड निजध्यासाने तुमचे इच्छित साध्य होवो ।
गुरुकृपेने तुमचे जीवन कृतार्थ सफल होवो ।। ६ ।।
हीच ईश्वरचरणी प्रार्थना !
– श्रीमती वर्षा गोगटे, सांगली (३०.११.२०२५)
‘देवांना सर्व कार्य सूक्ष्मातून करता येते, तरीही ते अवतार का घेतात ?’, या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी विचारलेल्या प्रश्नाचे ज्ञानमय उत्तर !
साधकांवर प्रीती करून त्यांना आधार देणारे आणि श्रीरामाप्रती उत्कट भाव असलेले भारताचार्य पू. प्रा. सु.ग. शेवडे (वय ९१ वर्षे) !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘विज्ञानामुळे मानवजात नष्टप्राय होण्याची स्थिती निर्माण होणे’ या विषयीच्या लिखाणाचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण !
२५ वर्षांपूर्वी प.पू. डॉक्टरांचे श्रीरामाविषयीचे मार्गदर्शन ऐकत असतांना ‘श्रीरामच स्वतःविषयी बोलत आहे’, असे जाणवून भावजागृती होणे
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतांना अल्पावधीत शारीरिक आणि मानसिक त्रास दूर होण्याच्या संदर्भात साधकाला आलेल्या अनुभूती !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या देवघरातील देवांच्या चित्रांमध्ये देवींच्या चित्रांपेक्षा अधिक प्रमाणात प्रभावळ वाढल्याचे दिसून येण्यामागील अध्यात्मशास्त्र !