
कराड, ३ डिसेंबर (वार्ता.) – तालुक्यातील मुंढे येथील रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या महिलेचा बनावट धर्मांध आधुनिक वैद्याने विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी अटक केलेल्या वैद्याकडे पोलिसांनी अधिक अन्वेषण केले असता, आधुनिक वैद्य बनावट असल्याचे उघडकीस आले. ॲलोपॅथीची कोणतीही वैद्यकीय पदवी नसतांना वैद्यकीय व्यवसाय चालू करून प्रशासन आणि रुग्ण यांची फसवणूक अल्ताफहुसेन उस्मानसाब नदाफ या धर्मांधाने केली आहे. त्याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
येथे शाहीन क्लिनिक नावाचे रुग्णालय आहे. गेल्या आठवड्यात या रुग्णालयामध्ये एक महिला पडताळणीसाठी गेली होती. त्या वेळी धर्मांध वैद्य अल्ताफहुसेन नदाफ याने महिलेचा विनयभंग केला. महिलेने पोलिसात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी संबंधित धर्मांध वैद्याला अटक केली. या वेळी रुग्णालयातून ॲलोपॅथी औषधांचा मोठा साठा सापडला. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची इंजेक्शने, गोळ्या, मलम, सलाईनच्या बाटल्या, नवीन आणि उपयोग केलेल्या सुया (सिरींज), धागे, निर्जंतुकीकरण द्रव्ये, तसेच इतर उपचार साहित्य आढळले. नदाफ याने ॲलोपॅथी पद्धतीने उपचार करून रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचे अन्वेषणात नमूद करण्यात आले.
हा ‘आरोग्य जिहाद’ आहे का ?
देहली येथील बाँबस्फोटाची घटना ताजी असतांनाच उघड झालेली ही घटना म्हणजे ग्रामीण भागामध्ये ‘आरोग्य जिहाद’चे लोण पोचल्याचा पुरावा नागरिकांकडून समजले जात आहे.
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
महिला सदस्यांच्या समितीद्वारे लैंगिक शोषणविरोधी कायद्यांचे पुनरावलोकन करावे !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
महिलांवरील वाढलेले अत्याचार हे वाढती लोकसंख्या आणि महिलांवरील जागृती यांमुळे ! – गृह विभाग