१. नामजप करण्याविषयी मिळालेली पूर्वसूचना !

‘२६.१०.२०२५ या दिवशी सकाळी मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, या ग्रंथावरील गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) छायाचित्र समोर ठेवून त्यांना आत्मनिवेदन करत होते. त्या वेळी सूक्ष्मातून गुरुदेव मला म्हणाले, ‘तिसर्या महायुद्धानंतर हिंदु राष्ट्र-स्थापनेकडे वाटचाल करता येण्यासाठी मी श्रीरामाचा नामजप करायला सांगणार आहे. त्यामुळे तुला श्रीरामाचे तत्त्वसुद्धा मिळेल.’ तेव्हा मला वाटले, ‘अजून तरी ‘श्रीरामाचा नामजप करायचा आहे’, असे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेले नाही. मग गुरुदेव असे का सांगत असावेत ?’; पण नंतर मी तो विचार सोडून दिला. मी तोपर्यंत दैनिक वाचले नव्हते. थोड्या वेळाने मला एका साधकांनी त्याच दिवशी दैनिकात प्रसिद्ध झालेली ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’, हा नामजप करण्याविषयीची चौकट पाठवली. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘सप्तर्षींनी नाडीपट्टीत उल्लेख केल्याप्रमाणे साधकांना रामराज्याकडे नेण्यासाठी श्रीरामाचे तत्त्व प्रदान करणारा श्रीरामाचा आणि युद्धात साधकांचे रक्षण होण्यासाठी श्रीकृष्णाचा नामजप करायचा आहे अन् त्या माध्यमातून गुरुदेवांनीच तो सांगितला आहे.’
२. नामजप करतांना आलेल्या अनुभूती
अ. ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे । हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।’, हा नामजप केल्यावर मला शांत वाटले. त्या वेळी गुरुदेवांचे श्रीराम आणि श्रीकृष्ण या वेशातील रूप माझ्या डोळ्यांसमोर आले अन् ते तत्त्व माझ्याकडून ग्रहण होत असल्याचे मला जाणवले.
आ. नामजप केल्यावर ‘तारक आणि मारक अशा दोन्ही प्रकारच्या ऊर्जा मिळत असून त्यामुळे मला साधना अन् सेवा करण्यासाठी लाभ होत आहे’, असे मला जाणवले.
इ. मला नामजपाची ओढ लागली आणि ‘नामजप करावा’, असे वाटू लागले.’
– कु. रजनीगंधा कुर्हे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.११.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
व्यष्टी साधना गांभीर्याने करणारे म्हार्दाेळ (गोवा) येथील श्री. परशुराम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७८ वर्षे) आणि सौ. पूनम प्रभुदेसाई (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ७९ वर्षे) !
साधकांची आध्यात्मिक पातळी घोषित करण्याच्या सत्संगात फोंडा, गोवा येथील सौ. स्नेहा शिवदत्त नाडकर्णी यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
पू. (कै.) श्रीमती आनंदी पाटीलआजी (वय १०४ वर्षे) यांचे अंत्यदर्शन घेतांना डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील साधकांनी अनुभवलेली उच्च आध्यात्मिक स्थिती !
वर्ष २०२५ मध्ये प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभपर्वाच्या कालावधीत साधिकेने भाववृद्धीसाठी केलेले प्रयत्न आणि तिला आलेल्या अनुभूती !
इतरांचा विचार करणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले म्हार्दोळ, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. परशुराम प्रभुदेसाई अन् सौ. पूनम प्रभुदेसाई !
समष्टीसाठी सतत झटणारे सनातनचे ७५ वे (समष्टी) संत पू. रमानंद गौडा (वय ४९ वर्षे)!