
नूह (हरियाणा) : हरियाणातील नूह पोलिसांनी पाकिस्तानच्या ‘आय.एस्.आय.’ (इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स) या गुप्तचर संस्थेसाठी हेरगिरी करणारा अधिवक्ता रिझवान याला नुकतीच अटक करण्यात आली. रिझवान हा हरियाणाच्या नूहमधील खरखडी गावचा रहिवासी आहे. तो गुडगाव येथील न्यायालयात वकिली करत होता. या हेरगिरीच्या प्रकरणी मुशर्रफ नावाच्या आणखी एका अधिवक्त्याला कह्यात घेण्यात आले आहे. हरियाणाच्या मेवात भागात या वर्षी संशयित पाकिस्तानी गुप्तहेर पकडला जाण्याची ही तिसरी वेळ आहे.
१. रिझवान पाकिस्तानमधील ‘आय.एस्.आय.’च्या संपर्कात होता. त्याला हवाला (बँकांव्यतिरिक्त अन्य मार्गांनी पैशांची देवाणघेवाण) मार्गाने कोट्यवधी रुपये मिळत होते.

२. या पैशांचा वापर आतंकवादी कारवाया, हेरगिरी आणि अमली पदार्थांची तस्करी यांसाठी केला जात होता, अशी माहिती अन्वेषण अधिकार्यांनी दिली. त्याची ८ दिवसांच्या पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
३. यापूर्वी मे महिन्यात पोलिसांनी महंमद तारिफ याला पाकिस्तानला भारतीय सैन्यदलाविषयी संवेदनशील माहिती पुरवल्याविषयी आणि अरमान याला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याविषयी अटक केली होती.
संपादकीय भूमिकामुसलमान डॉक्टर आतंकवादी कारवाया करत असल्याचे देहली येथील बाँबस्फोटावरून लक्षात आले होते आणि मुसलमान अधिवक्ताही देशविरोधी कारावाया करत असल्याचे समोर येत आहे. यावरून ‘गरिबीमुळे नव्हे, तर त्यांना देण्यात येणार्या कट्टरतावादी शिकवणीमुळे मुसलमान आतंकवादी किंवा देशविरोधी कारवायांकडे वळतात, हे सिद्ध होते ! |
भिलवाडा (राजस्थान) येथे ६ दिवसांचे ‘सनातन संस्कार प्रशिक्षण’ शिबिर पार पडले !
हिंदु जनजागृती समितीचे शंभू गवारे आणि सनातन संस्थेच्या बबिता गांगुली यांना ‘मातृभूमी सन्मान’ पुरस्कार प्रदान !
पुणे येथे गोवंशियांची हत्या करून मांस वाहून नेणारी चारचाकी पकडली !
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
Ulema Demand Ministerial Posts : कर्नाटक : मुसलमानांना ३ मंत्रीपदे देण्याची उलेमांची काँग्रेसकडे मागणी !
Jalna School Dance Row : संचालक तारिक सिद्दीकी, नृत्यशिक्षक साजिद शेख आणि निवेदिका उजमा तबस्सुम यांना अटक !