भाजपच्या खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक !

पुणे – ‘महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समिती’च्या अनौपचारिक बैठकीत शालेय अभ्यासक्रमात तिसरी भाषा म्हणून हिंदी शिकवावी, यासाठी आता पालकांनाही आवाहन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हिंदी भाषेच्या प्रचार-प्रसारासाठी हिंदी शिकवणार्या शिक्षकांची भाषा शिकवण्याची चांगली सिद्धता करून घेण्याच्या दृष्टीने उपक्रम आयोजित करण्याचे ठरवण्यात आले. ही बैठक भाजपच्या राज्यसभा खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘पहिलीपासून आपण इंग्रजी शिकू शकतो, तर हिंदीला का विरोध आहे ? लहानपणापासून बहुभाषिक दृष्टीकोन ठेवला, तर १ ते ६ वर्षे वयोगटात विषय आत्मसात करण्याची क्षमता अधिक असल्याने त्याचा लाभ होऊ शकतो. विभागीय स्तरावर काम करणार्या ‘राष्ट्रभाषा प्रचार समित्यां’ची बैठक घेऊ. त्यात तज्ञांना बोलावू. त्यात जे काही सुचवले जाईल, त्याचे निवेदन आम्ही ‘त्रिभाषा सूत्र समिती’ला देऊ.’’
कोठारी आयोगाच्या शिफारसींनुसार राज्यामध्ये त्रिभाषा सूत्राची कार्यवाही होत आहे. हे लक्षात ठेवून शक्य आहे त्या विद्यार्थ्यांना हिंदी शिकवावी, अशी विनंती पालकांना करण्यात येणार आहे.
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
मुंबईत ‘डबेवाले’ बांधवांच्या सन्मानार्थ वैद्यकीय पडताळणी आणि पाद्यपूजा !
खड्डे तक्रारीचे ‘पी.एम्.सी. रोड मित्र’ अॅप ४ महिन्यांपासून बंद !
पुणे येथे अधिवक्ता एस्.के. जैन यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ !
पानशेत (पुणे) पूरग्रस्त सोसाट्यांचे प्रश्न ६५ वर्षांनंतरही प्रलंबित !
हडपसर येथे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याला साहिल शेख आणि त्याच्या टोळीकडून बेदम मारहाण !