विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी केलेल्या पाठपुराव्याचा परिणाम
नवी मुंबई, २३ नोव्हेंबर (वार्ता.) – तुर्भे नाका येथील अवैध मशिदीवरील भोंग्यांवर तुर्भे पोलिसांनी कारवाई केली आहे. या कारवाईसाठी विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांनी पाठपुरावा केला. बजरंग दलाचे जिल्हा संघटक तेजस पाटील यांच्या तक्रारीनंतर तुर्भे पोलिसांनी ‘दारू सलाम’ या मशिदीवरील भोंगे उतरवण्याची कायदेशीर कारवाई केली आहे.
🚨 Justice Served in Navi Mumbai! 🚨
After persistent follow-up from VHP and Bajrang Dal, police finally took action against illegal loudspeakers fitted on an unauthorized mosque in Turbhe, Navi Mumbai. 🔊🚫
Shameful that even after the Bombay High Court ordered action against… pic.twitter.com/mKFTvTI71c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 24, 2025

१. तुर्भे नाका परिसरात ‘दारू सलाम’ ही अनधिकृत मशीद बांधण्यात आली आहे. या मशिदीवर लावलेल्या भोंग्यांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत होता. भोंगे आवाजाच्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात दिवसातून ५ वेळा वाजत होते. हा परिसर दाट लोकवस्तीचा असून या ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक वास्तव्यास आहेत. तसेच जवळ रुग्णालये असल्याने रुग्णांनाही या ध्वनीप्रदूषणाचा मोठा त्रास होत होता.
२. या समस्येविरोधात विश्व हिंदु परिषद अंतर्गत बजरंग दल, नवी मुंबई यांच्या वतीने तुर्भे पोलीस ठाण्यात वारंवार तक्रारी प्रविष्ट (दाखल) करण्यात आल्या होत्या.
३. गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यकर्ते सातत्याने पाठपुरावा करत होते.

४. पोलिसांकडून या कारवाईसंदर्भात अधिकृत पत्रदेखील प्राप्त झाले आहे. या कारवाईमुळे परिसरातील ध्वनीप्रदूषणाचा त्रास अल्प होणार असून स्थानिक नागरिक आणि रुग्ण यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
संपादकीय भूमिकामुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत प्रार्थनास्थळांवरील भोंग्यांवर कारवाई करण्याचा आदेश देऊनही त्यांवर स्वतःहून कारवाई न करणारे निष्क्रीय पोलीस प्रशासन ! हिंदुत्वनिष्ठ संघटनांना त्याविषयी पाठपुरावा करावा लागणे, हे पोलीस- प्रशासनाला लज्जास्पद ! |

थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !
कोल्हापूर आगारात ‘ई-शिवाई’ इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण उत्साहात !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !