Chaudhry Anwarul Haq : पाकने लाल किल्ल्यापासून काश्मीरपर्यंत आक्रमणे केली ! – चौधरी अन्वरुल हक, पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान

  • पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांची स्वीकृती

  • पाक सरकारने स्वत:स ठेवले दूर

वर्तुळात चौधरी अन्वरुल हक

इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकव्याप्त काश्मीरचे माजी पंतप्रधान चौधरी अन्वरुल हक यांनी पाक भारतात आतंकवादी आक्रमणे करत असल्याची सार्वजनिकरित्या स्वीकृती दिली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानी आतंकवाद्यांनी लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारताला लक्ष्य केले आहे. तथापि पाकने हक यांच्या विधानापासून स्वतःला दूर ठेवले. १७ नोव्हेंबरलाच विधानसभेने त्यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडून त्यांना हटवले होते. हक अडीच वर्षे पाकव्याप्त काश्मीरचे पंतप्रधान होते.

पाकव्याप्त काश्मीरच्या विधानसभेला दिलेल्या निवेदनात हक म्हणाले की,

१. मी आधीच सांगितले होते की, जर भारताने बलुचिस्तानला रक्ताच्या थारोळ्यात बुडवले, तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतावर आक्रमण करू. (‘उचलली जीभ आणि लावली टाळ्याला’, या वृत्तीचे चौधरी अन्वरुल हक ! भारताचा बलुचिस्तानमधील कारवायांशी दुरान्वयानेही संबंध नाही. पाकच्या अशा वक्तव्यांवर कोण विश्वास ठेवील ? – संपादक) काही दिवसांनी आमच्या शाहीनने (आतंकवादी डॉ. शाहीन) घुसून आक्रमण केले.

२. पंतप्रधानपदावर असतांना मी नरेंद्र मोदी आणि भारतातील त्यांच्या सरकारला आव्हान दिले होते.

संपादकीय भूमिका

भारतात फोफावलेला जिहादी आतंकवाद हा पाकपुरस्कृतच आहे. पाकच्या एका माजी पंतप्रधानाने केवळ ते सार्वजनिकपणे स्वीकारले, एवढेच ! यावरून आता भारताने पाकला जाब विचारत बसण्यापेक्षा त्यावर आक्रमण केले पाहिजे !