श्रीयश आयुर्वेदिक उपचार आणि महाविद्यालय याचे उद्घाटन !

छत्रपती संभाजीनगर – आगामी काळ हा आयुर्वेदाचा सुवर्णकाळ असेल. केंद्रशासनाच्या आयुष मंत्रालयाने या उपचारपद्धतीच्या शिक्षण, उपचार आणि संशोधन यांमध्ये चालना दिली आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. १६ नोव्हेंबर या दिवशी येथील ‘श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय ॲंड हॉस्पिटल रिसर्च सेंटर’च्या नवीन वास्तूचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.
फडणवीस आयुर्वेदाचे महत्त्व स्पष्ट करतांना म्हणाले की, ही उपचार पद्धती भारतीय जीवनशैलीशी सुसंगत असून निसर्गाशी साधर्म्य साधते. वेदांमध्ये ‘आयुर्वेद’ या नावाने तिचा उल्लेख आहे. आयुर्वेदात केवळ आजाराच्या लक्षणांवर उपचार न करता त्याच्या मुळाशी जाऊन शाश्वत उपचार केले जातात. जगभरात या उपचार पद्धतीचा वापर वाढत असून अनेक परदेशी नागरिक भारतात आयुर्वेदिक उपचारांसाठी पर्यटक म्हणून येत आहेत.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोविड-१९ महामारीच्या काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदिक औषधांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाला. केंद्रशासनाने या उपचारपद्धतीला विविध मार्गांनी प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे. प्रशिक्षित वैद्य सिद्ध करणे हा त्यातीलच एक महत्त्वाचा भाग असून त्यासाठी आयुर्वेद महाविद्यालयांना चालना दिली जात आहे. आगामी दशकात भारत जगातील तिसरी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था बनेल आणि वर्ष २०४७ पर्यंत आर्थिक महासत्ता होईल.
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री
धर्मांधाकडून हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढण्यासाठी वारंवार मानसिक छळ आणि धमक्या !
कर्नाटकात शाळांजवळ पिझ्झा-बर्गर यांच्या विक्रीवर लवकरच बंदी !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
गोव्यात २४ जुलैपर्यंत मध्यम पावसाची शक्यता