
नवी देहली – ‘राष्ट्रीय सुरक्षा आणि संस्कृतीरक्षण’ या उद्देशांनी सनातन संस्थेच्या वतीने १३ अन् १४ डिसेंबर या दिवशी देहलीतील ‘भारत मंडपम्’ येथे ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे छत्तीसगड समन्वयक श्री. हेमंत कानस्कर यांनी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री श्री. विजय शर्मा यांना दिले. या प्रसंगी सर्वश्री देवराज साहू, गोविंद साहू, रोशन साहू आणि प्रतीक रिझवानी हे मान्यवर उपस्थित होते.
‘द जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष संजय दीक्षित यांना निमंत्रण !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी ‘द जयपूर डायलॉग्ज’चे अध्यक्ष श्री. संजय दीक्षित यांना देहली येथे होणार्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवाचे निमंत्रण दिले.
बंगाल येथील स्वामी विश्वात्मानंदजी यांनाही निमंत्रण !

बंगाल येथील भारत सेवाश्रम संघाचे महासचिव स्वामी विश्वात्मानंदजी (दिलीप महाराज) यांनाही महोत्सवाचे निमंत्रण हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी दिले. या प्रसंगी समितीचे श्री. विमल जयसवाल, तसेच ‘भारतीय साधक समाज’चे संस्थापक सचिव श्री. अनिर्बान नियोगी हेही उपस्थित होते. गोव्यात झालेल्या शंखनाद महोत्सवाचा व्हिडिओ पाहून स्वामीजी यांनी या वेळी उत्स्फूर्तपणे म्हटले की, आपण माझ्या गुरूंचेच कार्य करत आहात. आपणास पुष्कळ आशीर्वाद !
‘जागरण न्यूज मीडिया’च्या राजकीय संपादिका (पोलिटिकल एडिटर) स्मृती रस्तोगी यांना निमंत्रण

अधिवक्त्या अमिता सचदेवा यांनी या महोत्सवाचे निमंत्रण ‘जागरण न्यूज मीडिया’च्या राजकीय संपादिका (पोलिटिकल एडिटर) स्मृती रस्तोगी यांना दिले.
Advocate @SachdevaAmita extends an invitation to @SmritiRastogi_ Political Editor at Jagran News Media (@JagranNewMedia), for the upcoming ‘Sanatan Rashtra Shankhnad Mahotsav’ in Delhi.
📅 13–14 December
📍 Bharat Mandapam, Delhi
🎯 Theme: National Security & Cultural… pic.twitter.com/5OSJbAOGJv
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 17, 2025
यावर रस्तोगी यांनी या महोत्सवाला उपस्थित रहाण्याचे आश्वासन दिले.
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
मुंबई येथे सनातन संस्थेने केलेल्या ‘श्री राजमातंगीदेवी महायज्ञा’च्या संदर्भात सनातन संस्थेच्या हितचिंतकांनी व्यक्त केलेले मनोगत !
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !
Amarkantak Temple Donation Scam : अमरकंटक (मध्यप्रदेश) येथील नर्मदा उगम मंदिरातील सोने-चांदी गायब !
Three Language Policy : इंग्रजी भारताचीच स्थानिक भाषा मानली जाऊ शकते का ? – सर्वाेच्च न्यायालयाचा प्रश्न