
काबुल (अफगाणिस्तान) : कृषी संशोधनाला चालना देण्यासाठी भारत अफगाणिस्तानात ‘अफगाण हिंदु संशोधन केंद्र’ चालू करणार आहे. भारताचे राजनैतिक अधिकारी करण यादव आणि अफगाणिस्तानचे कृषी मंत्री अताउल ओमारी यांच्या झालेल्या भेटीत हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
ओमारी म्हणाले की,
४ दशकांहून अधिक काळ अफगाणिस्तानवर हवामान पालटांचा गंभीर परिणाम होत आहे. दुष्काळ आणि पिकांवरील कीटक यांमुळे देशातील कृषी उत्पादनाचे प्रमाण अन् गुणवत्ता दोन्ही लक्षणीय प्रमाणात उणावले आहे. यावर उपाय म्हणून हवामान-प्रतिरोधक पीक जाती विकसित करण्यासाठी वैज्ञानिक संशोधनाची नितांत आवश्यकता आहे. या वेळी ओमारी यांनी भारतात कृषी आणि पशूधन उत्पादने निर्यात करणार्या अफगाणी व्यापार्यांना व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्याचीही विनंती केली.
यावर यादव यांनी ‘अफगाण हिंदु संशोधन केंद्र’ चालू करण्याचे सुतोवाच केले, तसेच यासाठी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यासह ओमारी यांनी उपस्थित केलेल्या सर्व सूत्रांवर विचार करण्याचेही आश्वासन दिले.
संपादकीय भूमिकासरकारने इस्लामी देशातील हिंदूंची दुरवस्था रोखण्यासाठीही असे एखादे केंद्र चालू करून त्या माध्यमातून ठोस कृती करावी, अशी हिंदूंची अपेक्षा आहे ! |
डेन्मार्क सरकार रस्त्यावर नमाजपठण आणि अजान यांवर बंदी घालण्याच्या विचारात !
पारपत्रावरून नागरिकत्व सिद्ध होत नाही ! : Central Goverment
Asim Munir Assassination Plan : इस्रायलची गुप्तचर यंत्रणा ‘मोसाद’ने रचला होता पाकचे सैन्यदलप्रमुख असीम मुनीर यांच्या हत्येचा कट !
बांगलादेशात गेल्या ५ महिन्यांत हिंदूंविरुद्ध ६४५ गुन्हे !
Venezuela Earthquake : १० सहस्र ते १ लाख लोकांच्या मृत्यूची शक्यता
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर शेतकर्यांनी नियोजनबद्ध शेती करावी ! – भाग्यश्री फरांदे, जिल्हा कृषी अधीक्षक