|
भोपाळ (मध्यप्रदेश) –‘हक’ या हिंदी चित्रपटाला मध्यप्रदेश उच्च न्यायालयाने प्रदर्शनासाठी अनुमती दिली आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनावर तात्काळ बंदी घालण्याची मागणी करणारी शाहबानो यांची मुलगी सिद्दिका बेगम खान यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. हा चित्रपट ७ नोव्हेंबर २०२५ या दिवशी प्रदर्शित होणार होता. ६ नोव्हेंबर २०२५ या दिवशी निकाल देतांना उच्च न्यायालयाने म्हटले की, हा चित्रपट कुणाच्याही वैयक्तिक गोपनीयतेचा भंग नाही.
🎬 Madhya Pradesh High Court clears Hindi film ‘Haq’ for release!
⚖️ Petition by Shah Bano’s daughter seeking a ban dismissed.
🧾 Court observed: “The movie does not violate anyone’s privacy.”
🎥 Makers said it’s a fictional story, not targeting any community.
🎞️ Release: Nov… pic.twitter.com/1kX3Fnb5Zp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 7, 2025
१. सिद्दिका बेगम यांनी याचिकेत नमूद केले होते की, ‘चित्रपट निर्मात्यांनी शाहबानो यांच्यावर चित्रपट सिद्ध करण्यापूर्वी त्यांच्या कायदेशीर वारसांची अनुमती घेतलेली नाही, तसेच या चित्रपटात शरीयत कायद्याचे नकारात्मक चित्रण करण्यात आले आहे. त्यामुळे मुसलमान समाजाच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात’, अशीही भूमिका या याचिकेत मांडण्यात आली होती.
२. चित्रपट निर्मात्यांची बाजू मांडतांना अधिवक्ता ऋतिक गुप्ता आणि अधिवक्ता अजय बगाडिया यांनी युक्तीवाद केला की, हा चित्रपट पूर्णपणे काल्पनिक कथानकावर आधारित आहे. या चित्रपटाचा उद्देश कुठलीही व्यक्ती किंवा समाज यांच्या भावना दुखावणे, हा नाही.
३. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने शाहबानो यांच्या मुलीची याचिका फेटाळली आणि चित्रपटाच्या प्रदर्शनास अनुमती दिली.
काय आहे शाहबानो प्रकरण ?
शाहबानो या इंदूर, मध्यप्रदेश येथील एक मुसलमान महिला होत्या. इंदूरमधील प्रसिद्ध अधिवक्ता महंमद अहमद खान यांच्याशी वर्ष १९७८ मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना ५ मुले होती. त्या ६२ वर्षांच्या असतांना त्यांच्या पतीने त्यांना घटस्फोट दिला. शाहबानो यांनी पोटगीसाठी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वाेच्च न्यायालयाने त्यांना त्यांच्या पतीकडून पोटगी मिळायला हवी, असा आदेश दिला. त्यानंतर भारतात विविध धर्मांसाठी विविध नागरी कायदा करण्यापर्यंत हे प्रकरण पोचले.

Chhattisgarh Tribal Christians : नारायणपूर (छत्तीसगड) येथील गावात ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या आदिवासींना गावकर्यांनी गावाबाहेर काढले !
संपादकीय : पारपत्राचा अनावश्यक गोंधळ !
सिनेमा आणि स्वतःची स्वप्ने : यशाविषयी सिनेमा काय प्रकट करतो ?
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !