निरोगी जीवनासाठी व्यायाम : लेखांक क्रमांक ९६
अर्गाेनॉमिक्स
(टीप : अर्गोनॉमिक्स : दैनंदिन कामे करतांना शरिराच्या ठेवणीविषयी पाळायचे नियम.)
‘आजचे युग तंत्रज्ञानाचे आहे. नोकरी करणारे बहुतेक जण दिवसभरातील आपला अधिकांश वेळ संगणकाच्या समोर असतात. हेच त्यांच्यासाठी सर्वांत त्रासदायक ठरू शकते. संगणकीय कामे करणार्यांना अल्प वयातच मानेचे आजार झाल्याचे बर्याचदा ऐकायला मिळते. ‘संगणकीय कामे करतांना कोणते नियम पाळायला हवेत ?’, हे आपण आजच्या आणि पुढील लेखांतून जाणून घेणार आहोत.
(भाग ३)
याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/971418.html

संगणकीय कामे करणार्या व्यक्तींची मान आणि खांदे यांची सर्वाधिक हानी होते. मान आणि खांदे पुढे गेल्याने पाठ अन् मणका यांवर ताण येऊन गंभीर आजार होऊ लागतात. संगणकासमोर मान आणि खांदे पुढे करून बसणारे म्हणतात, ‘‘ते आपोआपच पुढे येतात.’’ आपण कधी कामात गुंग झाल्यामुळे, तर कधी संगणकाच्या पडद्यावरील (‘स्क्रीन’वरील) लिखाण किंवा चित्र नीट पहाण्यासाठी बहुधा असे होते की, आपण जरा विश्राम स्थितीत बसतो आणि आपोआपच मान अन् खांदे पुढे येतात. याचे मूळ कारण आहे, आपली पाठ ! आपण पाठीतून ताठ बसलो नाही, तर मान आणि खांदे सरळ रेषेत आणणे शक्यच नाही. त्यामुळे आपण अधिक काळ काम करतांना थोडे विश्राम स्थितीत आलो की, पाठ आपोआपच वाकते आणि मान आणि खांदे पुढे येतात. याउलट कमरेतून पुढे सरकून बसल्यावरही मणक्याची स्थिती चांगली रहात नाही.
१. बसण्याच्या अयोग्य पद्धती आणि त्यांचा शरिरावर होणारा परिणाम
१ अ. आसंदीला न टेकता पुढे वाकून बसणे

१. मान आणि खांदे यांचे आजार होतात.
२. पाठ आणि कंबर यांवर ताण येऊन मणक्याचे त्रास चालू होतात.
३. दीर्घकाळ बसल्यावर पाठ दुखू लागते.
१ आ. कंबर पुढे सरकवून रेलून बसणे


१. माकडहाडावर दाब पडल्यामुळे तेथे वेदना होऊ शकतात, तसेच कालांतराने त्याचा आकार पालटू शकतो आणि वेदना कायमस्वरूपी राहू शकतात.
२. मणक्यातील गादीवर ताण येतो आणि ‘स्लिप डिस्क’सारखे (विशेष करून कमरेचे) आजार होऊ शकतात.
३. या स्थितीतही मान आणि खांदे पुढे घ्यावे लागतात. त्यामुळे शरिराची ठेवण बिघडते.
२. दीर्घकाळ बसायचे असल्यास करायच्या उपाययोजना !
मान आणि खांदे यांची स्थिती सुधारण्यासाठी कमरेतून ताठ बसायला हवे. त्यामुळे कमरेकडे मणक्याला असलेला नैसर्गिक अंतर्बाक टिकून रहातो. दीर्घकाळ बसायचे असल्यास हे शक्य नसते. यासाठी पुढील उपाययोजना करू शकतो.

अ. कमरेकडे आधार असलेली आसंदी असावी. (या आसंद्यांना कमरेकडे पुढच्या दिशेने बाक किंवा उंचवटा असतो.)

आ. आसंदीला पूर्ण पाठ टेकून बसावे.
इ. कमरेकडे कमरेला आधार देण्यासाठी ‘लंबर सपोर्ट’ (lumbar support) किंवा एखादी छोटी उशी ठेवावी. उशीची रुंदी आपल्याला कमरेकडे आराम वाटेल, इतकी ठेवावी. (सर्वसाधारण व्यक्तीला अडीच ते ४ इंच रुंदीची उशी आरामदायी वाटते.)
ई. उशीऐवजी जाड टॉवेलही गुंडाळून ठेवू शकतो. आपल्या आवश्यकतेनुसार तो घट्ट किंवा थोडा सैल गुंडाळून ठेवू शकतो.’
– श्री. निमिष म्हात्रे, भौतिकोपचार तज्ञ, फोंडा, गोवा. (२८.१०.२०२५)
भाग ४ वाचण्यासाठी क्लिक करा → https://sanatanprabhat.org/marathi/976089.html
जुने ते सोने !
‘कॉर्पोरेट’ (व्यावसायिक) नव्हे, धर्मांतर आणि बलात्कार यांचे केंद्र !
‘डिस्काऊंट’च्या (सवलतीच्या) मोहात आरोग्याचा सौदा !
बंगाल बोध : घुसखोरांना साहाय्य हा देशद्रोह नव्हे का ?
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !