
‘१३.४.२०२५ या दिवसापासून मला देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत रात्री झोपण्याची संधी मिळाली.

(परात्पर गुरु पांडे महाराज विद्यमान (हयात) असतांना ते ज्या खोलीत रहात होते, ती खोली त्यांच्या चैतन्याने भारित झाली आहे. आता त्या खोलीत साधक नामजपादी उपाय करण्यासाठी बसतात आणि आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी तेथे रात्री साधिका झोपतात.) त्या खोलीत झोपल्यावर मला रात्रभर थंडगार वाटत होते; मात्र सकाळी मी माझ्या निवासाच्या खोलीत गेल्यावर मला तेथे उष्णतेच्या वाफा जाणवल्या. परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या चैतन्यामुळे त्यांच्या खोलीत गारवा निर्माण झाला आहे. त्यामुळे मला तेथे थंडगार वाटले आणि पुष्कळ चैतन्यही जाणवले.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीत झोपण्याची संधी मिळाली आणि तेथील चैतन्य अनुभवता आले’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. विमल गरुड, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१५.४.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
लक्षात घ्या साधनेच्या संदर्भात भारताचे महत्त्व !
सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि त्यांच्या पत्नी आधुनिक वैद्या (सौ.) मधुवंती पिंगळे यांच्या सत्संगात दिग्रस (जिल्हा यवतमाळ) येथील साधिकांना आलेल्या अनुभूती !
समर्थ रामदासस्वामींच्या ‘दासबोधा’तील संदर्भांवरून ‘१०८’ या जपसंख्येचे महत्त्व !
सनातन संस्थेच्या वतीने मुंबई येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती !
बेळगाव येथील कु. सरोजा लक्ष्मण मन्नोळकर (वय १५ वर्षे) हिला रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात गेल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !
अंतर्यामी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि त्यांची साधकांवरील प्रीती !