‘चीन अणूचाचण्या करतो’, या ट्रम्प यांच्या दाव्यावर चीनचे उत्तर !

बीजिंग (चीन) / इस्लामाबाद (पाकिस्तान) – संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा कायम सदस्य आणि अण्वस्त्रधारी देश म्हणून आम्ही अण्वस्त्रांचा प्रथम वापर न करण्याची भूमिका घेतली आहे. आम्ही आत्मरक्षणात्मक अणूनीतीचा अवलंब करतो आणि अणूचाचण्या थांबवण्याच्या आमच्या वचनबद्धतेचा सन्मान करतो. चीन ‘व्यापक अणूचाचणी प्रतिबंध करारा’ला (‘सीटीबीटी’ला – ‘कॉम्प्रेन्सिव्ह न्यूक्लिअर टेस्ट बॅन ट्रीटी’) पाठिंबा देतो आणि अमेरिकेनेही त्या करारातील त्याचे दायित्व पाळावे, अशी अपेक्षा आहे. आम्ही आशा करतो की, अमेरिकाही अणूचाचण्यांवरील स्वतःची बंदी कायम ठेवेल आणि जागतिक स्थैर्यास हातभार लावेल, अशा शब्दांत चीनने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांच्या दाव्यावर उत्तर दिले आहे. ट्रम्प यांनी रशिया, चीन, उत्तर कोरिया आणि पाकिस्तान न सांगता अणूचाचण्या करत असल्याचा दावा केला होता.
🇨🇳 China rebuts Trump’s claim of secret nuclear tests
🧩 Says it follows CTBT treaty and keeps “no first use” nuclear policy
⚛️ Urges US to follow the same and support global stability
🇵🇰 Pakistan also denies Trump’s charge, says it never began tests and will not restart them… https://t.co/vIXMXJWW9E pic.twitter.com/VWK5Z5rlY2
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) November 5, 2025
आम्ही अणूचाचणी पुन्हा चालू करणारा देश असणार नाही ! – पाकचे स्पष्टीकरण
पाकिस्तान अणूचाचण्या करणारा पहिला देश नव्हता आणि अणूचाचण्या पुन्हा प्रारंभ करणारा पहिला देश असणारही नाही, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानच्या एका अधिकार्याने ट्रम्प यांच्या दाव्यावर व्यक्त केली आहे. ट्रम्प यांनी अणूचाचणी करणार्यांमध्ये पाकिस्तान असल्याचाही दावा केला होता. अद्याप पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ किंवा त्यांच्या सरकारमधील कोणत्याही मंत्र्याने यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
संपादकीय भूमिकाचीन आणि पाकिस्तान या दोघांनीही अणूचाचण्या केल्याचा ट्रम्प यांचा दावा फेटाळला आहे, तर आता ट्रम्प यांनी जगाला या संदर्भात पुरावे दाखवले पाहिजेत, अन्यथा ट्रम्प यांच्यावरील विश्वास आणखी न्यून होईल ! |
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !