
दोडामार्ग – भ्रमणभाष ‘रिचार्ज’चे पैसे परत (रिफंड) मिळवून देण्याच्या बहाण्याने येथील एका सेवानिवृत्त वृद्धाची १ लाख ९३ सहस्र ५०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी दोडामार्ग पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२३ मार्च २०२६ या दिवशी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास वृद्ध व्यक्तीला भ्रमणभाषवर एका अज्ञात व्यक्तीने संपर्क केला आणि ‘तुम्हाला तुमच्या भ्रमणभाष ‘रिचार्ज’चे १ सहस्र ४९९ रुपये परत मिळणार आहेत’, असे सांगितले. त्यानंतर अज्ञात व्यक्तीने वृद्ध व्यक्तीला भ्रमणभाषवर प्रक्रिया करण्यास सांगितले. वृद्ध व्यक्तीने विश्वास ठेवून अज्ञात व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे भ्रमणभाषमध्ये प्रक्रिया केली. त्यानंतर वृद्ध व्यक्तीच्या ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या दोडामार्ग शाखेतील एका बचत खात्यातून ९५ सहस्र रुपये आणि दुसर्या बचत खात्यातून ९८ सहस्र ५०० रुपये, असे एकूण १ लाख ९३ सहस्र ५०० रुपये ऑनलाईन पद्धतीने काढण्यात आले. यामुळे स्वत:ची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच वृद्ध व्यक्तीने पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
खांदेश्वर येथे रखडलेल्या कामांना गती देणार असल्याचे महापालिकेचे आश्वासन !
इगतपुरीतील धरणाजवळ पर्यटकांवर आक्रमण करणार्या ९ स्थानिक गुंडांना अटक !
वसईत मिठाईच्या दुकानदाराला लुटणार्या तोतया अधिकार्यांवर गुन्हा नोंद !
हॉटेलवर कारवाई करणार्या पोलिसाचे निलंबन रहित !
चाकण (पुणे) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षकाने मागितली १० लाख रुपयांची लाच
मी छत्रपती शिवाजी महाराजांचा पाईक असून मैदान सोडून जाणारा नाही !