
फोंडा, ३ जून (वार्ता.) – गोवा सरकार भारतरत्न स्व. लता मंगेशकर आणि प्रसिद्ध गायिका स्व. आशा भोसले या दोन्ही बहिणींच्या स्मरणार्थ मंगेशी येथे स्मारक, तसेच दोन्ही गायिकांना समर्पित असे संग्रहालय उभारण्याचा विचार करत आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी दिली आहे. मंत्री रोहन खंवटे यांनी २ जून या दिवशी मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थान आणि फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्याला भेट देऊन तेथील कामांची पहाणी केली. फर्मागुडी येथे पत्रकारांशी बोलतांना मंत्री रोहन खंवटे यांनी ही माहिती दिली.
ते पुढे म्हणाले, ‘‘सरकार धार्मिक पर्यटनाला चालना देत आहे. मंगेशी परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मंगेशी परिसरातील पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, वाहनतळ सुविधा आदी वाढवण्यावर भर दिला जात आहे. मंगेशी येथे ‘टपाल तिकीट संग्रहालयही उभारण्यात येणार आहे. या संग्रहालयात गोव्याचा इतिहास, संस्कृती, स्वातंत्र्य चळवळ आणि सामाजिक जीवनाशी संबंधित दुर्मिळ टपाल तिकिटांचा संग्रह ठेवण्यात येणार आहे. यामुळे देश-विदेशातील पर्यटकांना गोव्याचा समृद्ध वारसा एका वेगळ्या माध्यमातून अनुभवता येईल. स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले या मूळ गोव्यातील असल्याने त्यांच्या कार्याचा सन्मान केला जात आहे. सरकार धार्मिक पर्यटनासमवेतच सांस्कृतिक आणि वारसा पर्यटन यांनाही चालना देत आहे. फर्मागुडी येथील छत्रपती शिवाजी महाराज किल्ल्याच्या ठिकाणी वस्तूसंग्रहालय, शस्त्रभांडार आदी सुविधा १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे.’’
वेर्णा येथील आस्थापनांना जेवण पुरवणार्या अस्वच्छ केंद्राच्या विरोधात तक्रार
सासष्टी तालुक्यात तळावली येथे ‘धिर्यो’साठी गर्दी : तक्रार करूनही पोलिसांची कारवाई नाही
सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बुरुजाच्या पायथ्याचे काही दगड कोसळले !
सत्तरी तालुक्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत
शिक्षण संचालनालयाकडून ‘एस्.आय.ओ.’च्या विरोधातील मार्गदर्शक तत्त्वांचे परिपत्रक मागे
‘एस्.एन्.डी.टी. महिला विद्यापिठा’च्या कारभाराची चौकशी होणार !