
सांखळी, ३ जून (वार्ता.) – गोव्याचा ऐतिहासिक वारसा जतन करण्याला नवी दिशा देणारा सांखळी येथील पुरातन किल्ला आता सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पर्यटन या दृष्टीने महत्त्वाचे केंद्र म्हणून विकसित केला जाणार आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. ३ जून या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या सोहळ्याला नगराध्यक्ष सिद्धी प्रभु, उपनगराध्यक्ष दयानंद बोर्येकर, पुरातत्व खात्याचे संचालक डॉ. नीलेश फळदेसाई, जिल्हा सदस्य सुंदर नाईक, सरपंच गौरवी नाईक, महेश सावंत, आनंद काणेकर, मिलिंद रामाणी, प्रियांका डायस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या वेळी मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘गोव्याची ओळख केवळ समुद्रकिनारे आणि चर्च एवढीच नसून किल्ले, मंदिरे, पुरातन वास्तू हेच राज्याचे खरे वैभव आहे. या वारशाचे जतन करणे, हे आपले सामूहिक उत्तरदायित्व आहे.’’ या किल्ल्याचे ‘खेम सावंत भोसले किल्ला’ असे नामकरण करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली. किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. पुरातत्व खात्याने ३ कोटी २५ लाख रुपये खर्च करून किल्ल्याचे संवर्धन आणि नूतनीकरण केले असून या कामाला वर्ष २०१९ पासून प्रारंभ करण्यात आला होता. किल्ल्याचे नूतनीकरण करतांना मूळ ऐतिहासिक रचना अबाधित ठेवून आधुनिक सुविधांचा समन्वय साधण्यात आला आहे.
डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
राज्यातील ८ सहस्रांहून अधिक शिक्षकांचे एका दिवसाचे वेतन कापले !
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !