कर्नाटकातील मुसलमानांची काँग्रेसला धमकी
हुब्बळ्ळी (कर्नाटक) – राज्यात डी.के. शिवकुमार यांचे नवीन सरकार स्थापन झाले आहे. त्यांच्यासह १३ मंत्र्यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यात यू.टी. खादर या मुसलमान मंत्र्याचा समावेश आहे. शपथविधी झाल्यानंतर लगेचच मुसलमानांनी मंत्रीमंडळात आणखी ४ मुसलमानांना मंत्रीपद देण्याची मागणी केली आहे. आमदार जमीर अहमद, एन्.ए. हॅरिस, तन्वीर शेठ आणि सलीम अहमद यांना मंत्रीपद देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ही मागणी हुब्बळ्ळीत मुसलमान धर्मगुरू आणि राजकीय नेते यांनी केली आहे. ‘जर आमची ही मागणी पूर्ण झाली नाही, तर आगामी निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला आमची शक्ती काय आहे ?, हे दाखवून द्यावे लागेल’, अशी धमकीही त्यांनी दिली आहे.
मुसलमानांच्या मतांमुळे काँग्रेस सत्तेत आल्याचा दावा !
वृत्तवाहिनींसमोर मुसलमान धर्मगुरूंनी म्हटले की, राज्यात मुसलमानांच्या एकगठ्ठा मतदानामुळे काँग्रेस सत्तेवर आली आहे. (हिंदूंना हे मान्य आहे का ? मुसलमानांच्या मतांमुळे निवडून आलेली काँग्रेस हिंदूंना तुच्छ लेखते, हे हिंदूंना कधी कळणार ? – संपादक) त्यामुळे काँग्रेस पक्षाला मुसलमान समाजाचे ऋण फेडणे भाग आहे. आगामी लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षनेतृत्वाने तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा पक्षाला मोठा राजकीय फटका बसेल हे निश्चित, अशी चेतावणीही त्यांनी दिली.

ख्रिस्ती, मुसलमान आणि साम्यवादी यांच्या खोट्या कथानकांपासून हिंदु धर्माचे रक्षण !
‘नीट’ परीक्षेच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका !
भारताचे तुकडे होण्याच्या घोषणा देणारे देशद्रोहीच ! – मनोज मुंतशीर, संगीतकार
काँग्रेस नेत्यांनी कर्नाटकातील मंदिरांच्या १८ लाख रुपयांची केली लूट ! : भाजप
Dr. Anand Ranganathan : ‘उपोषण म्हणजे अराजकता’, हे डॉ. आंबेडकरांचे वक्तव्य, ही सोनम वांगचुक यांना चपराक !
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन