(१ कोस म्हणजे अनुमाने ३ किलोमीटर)

भरतपूर (राजस्थान) – एकीकडे सासू-सुनेच्या नात्यात अनेकदा संघर्ष आणि कटुता पहायला मिळत असतांना दुसरीकडे राजस्थानमधील भरतपूर येथील ब्रजभूमी परिसरात एक अत्यंत अनोखे आणि हृदयस्पर्शी दृश्य समोर आले आहे. येथे हरियाणामधील हताना गावातील रहिवासी असलेली काजल चौधरी नावाची सून तिच्या ९० वर्षीय वृद्ध सासूला एका प्लास्टिकच्या टबमध्ये बसवून आणि तो स्वतःच्या डोक्यावर वाहून नेत, पायी चालत कठीण आणि खडतर अशी ८४ कोस प्रदक्षिणा पूर्ण करत आहे. (अनुमाने २५२ किलोमीटर) काजल चौधरी या एक अत्यंत लोकप्रिय आणि प्रख्यात लोकगायिका आहेत.
१. काजल यांची सासू चंद्री देवी यांची अनेक वर्षांपासून ‘ब्रज’ची प्रसिद्ध ८४ कोस प्रदक्षिणा करण्याची इच्छा होती; परंतु शारीरिक मर्यादांमुळे त्या हतबल झाल्या होत्या. हे समजल्यानंतर काजल यांनी सासूचे हे स्वप्न पूर्ण करणे, हेच स्वतःच्या आयुष्याचे मुख्य ध्येय बनवले.
२. काजल यांनी त्यांच्या आपल्या सासूबाईंना एका मोठ्या प्लास्टिकच्या टबमध्ये बसवले, तो टब डोक्यावर उचलून घेतला आणि बनाचारी गावातून या अत्यंत खडतर पायी तीर्थयात्रेचा प्रारंभ केला.
३. काजल जसजसा हा मार्ग कापत भरतपूरच्या सीमेवरून पुढे जात आहे, तसतसे स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक या आदर्श सूनबाईंचे फुले, हार आणि आरती करून मोठ्या थाटात स्वागत करत आहेत. काजल यांची ही यात्रा अद्याप चालू आहे.
‘एन्.सी.ई.आर्.टी.’च्या पाठ्यपुस्तकात मराठा साम्राज्याचा इतिहास पुन्हा समाविष्ट करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा चालू ! – दादा भुसे, शालेय शिक्षणमंत्री
मुंबई लोकलमधील धर्मांतर आणि भोंदूगिरी यांचे छुपे संकट रोखण्यासाठी विशेष नियमावली सिद्ध करणार !
स्त्रीत्वाचा उत्सव !
२७ जूनला ‘लव्ह जिहाद’ची नवी भयावहता आणि उपाययोजना यांवर इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे विशेष व्याख्यान !
कल्याण येथे ७ वर्षांच्या मुलीवर अत्याचार; मुसलमान अटकेत !
कायदा असूनही गोवंश हत्या रोखण्यासाठी झगडावे लागते ! – खासदार प्रा. डॉ. (सौ.) मेधा कुलकर्णी