डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांना सोडून पळाले !
मुझफ्फरपूर (बिहार) – येथे एका खासगी रुग्णालयाच्या अतीदक्षता विभागामध्ये आग लागल्याने ४ लोकांचा मृत्यू झाला, तर २० हून अधिक लोक घायाळ झाले. ही घटना ३ मेच्या रात्री घडली. स्थानिक लोकांच्या मते मृत्यूचा आकडा वाढू शकतो. हा विभाग ५ व्या मजल्यावर असल्याने अग्नीशमन दलाला साहाय्यता कार्यात अडचण आली. लोकांचे म्हणणे आहे की, आग लागल्यानंतर वेळेवर पाण्याची व्यवस्था केली असती, तर मृतांची संख्या अल्प झाली असती.
१. रुग्णांच्या कुटुंबाचा आरोप आहे की, आग लागल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचारी रुग्णांना आहे त्या स्थितीत सोडून पळून गेले.
२. अग्नीशमन दलाच्या एका अधिकार्याने दावा केला की, जेव्हा त्यांचे पथक घटनास्थळी पोचले, तेव्हा रुग्णालयातील बहुतेक कर्मचारी तिथे उपस्थित नव्हते.
३. मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी सुब्रता कुमार म्हणाले की, निष्काळजीपणासाठी रुग्णालयाच्या प्रशासनावर कारवाई केली जाईल. काही नातेवाइकांचा आरोप आहे की, त्यांचे रुग्ण वॉर्डमधून गायब आहेत. प्रत्येक पैलूची चौकशी केली जात आहे.

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !
श्रीराममंदिरातील दान चोरीच्या प्रकरणात मोठ्या लोकांना सोडून दिले ! – Shankaracharya Avimukteshwaranand Saraswati
NCERT : पुस्तकात वैदिक काळात महिलांना सन्मान मिळत असल्याचे सांगत मनुस्मृतीतील श्लोकाचा उल्लेख !