Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !

जपानमध्ये बांधलेली अवैध मशीद

टोकियो (जपान) – जपानमधील सैतामा प्रांतातील कावागोए येथे पाकिस्तानने बांधलेली मशीद अवैध असल्याचे प्रशासनाने म्हटले असून ती पाडण्यात येणार असल्याचे सांगितले. ही मशीद डोंगराळ वनभूमी म्हणून वर्गीकृत केलेल्या ४ सहस्र ५०० चौरस मीटरच्या भूखंडावर बांधण्यात आली असून स्थानिक प्रशासनाने यावर आक्षेप घेतला आहे. कावागोएमधील ही जागा शहरीकरण नियंत्रण क्षेत्रात येते. येथे स्थानिक अधिकार्‍यांकडून विशेष अनुमती मिळाल्याविना बांधकाम करता येत नाही. विशेष म्हणजे या मशिदीच्या उद्घाटनाला जपानमधील पाकिस्तानचे राजदूत अब्दुल हमीद उपस्थित होते. त्यामुळे हे प्रकरण उघडकीस आले.

पाकिस्तानकडून स्पष्टीकरण

स्थानिक कायद्याचे पालन न करता उभारण्यात आलेल्या या मशिदीचा पाकिस्तानशी काहीही संबंध नाही. अनुमती घेऊनच मशीद बांधल्याची निश्चिती मिळाल्यानंतर पाकिस्तानचे राजदूत उद्घाटनाला उपस्थित होते. मुसलमान नागरिकांनी स्थानिक प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पाकिस्तानकडून करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

भारतातच नव्हे, तर जपानमध्येही धर्मांध मुसलमान अवैध मशिदी बांधतात आणि प्रशासन झोपा काढते !