|

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक सरकारने रा.स्व. संघाला लक्ष्य करत खासगी संस्थांना सरकारी इमारती, सार्वजनिक ठिकाणे, रस्ते इत्यादी ठिकाणी कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यापूर्वी प्रशासनाची अनुमती घेणे अनिवार्य केले होते. आता कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपिठाने सरकारच्या या आदेशाला स्थगिती देत पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. राज्य सरकारच्या या आदेशाविरुद्ध ‘पुनश्चैतन्य सेवा संस्थे’ने कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती.
⚖️ Justice Prevails
Karnataka HC stays Congress Govt’s arbitrary order mandating permission for public events.
⚖️ न्याय की जीत
कर्नाटक हाईकोर्ट ने कांग्रेस सरकार के सार्वजनिक आयोजनों पर अनुमति अनिवार्य आदेश पर रोक लगा दी।#CongressExposed#RSS100Years pic.twitter.com/H56xWnOvgt
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 28, 2025
सरकारचा आदेश भारतीय राज्यघटनेत दिलेल्या मूलभूत अधिकारांवर बंदीसमान !
संस्थेच्या वतीने ज्येष्ठ अधिवक्ता अशोक हरनहळ्ळी यांनी सांगितले की, सरकारचा आदेश भारतीय राज्यघटनेत दिलेल्या मूलभूत अधिकारांवर बंदीसमान आहे. सरकारच्या आदेशानुसार १० पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यासाठीही शासनाची अनुमती घ्यावी लागेल, हे मूलभूत अधिकारांचे उल्लंघन आहे. अगदी उद्यानात एखादा कार्यक्रम घेतला, तरी हा आदेश त्यालाही बेकायदेशीर ठरवतो. जेव्हा पोलीस कायदे अस्तित्वात आहेत, तेव्हा अशा प्रकारचा प्रशासकीय आदेश काढण्याची आवश्यकताच काय होती ? सरकार अशा प्रकारचे आदेश जारी करू शकत नाही.
यावर राज्य सरकारच्या वतीने उपस्थित अधिवक्त्यांनी प्रत्युत्तरासाठी एका दिवसाची मुदत मागितली. खंडपिठाने सरकारच्या आदेशावर अंतरिम स्थगिती देत निरीक्षण नोंदवले की, या आदेशाद्वारे कर्नाटक सरकार भारतीय राज्यघटनेतील कलम १९(१)(अ) आणि १९(१)(ब) अंतर्गत दिलेले अधिकार हिरावून घेत आहे.
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
निकृष्ट दर्जाच्या सुपारीवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई
मुख्य आरोपींवर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करणार !
श्री महालक्ष्मीदेवी विकास आराखडा : प्राथमिक सर्वेक्षण पूर्ण !
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !