भारतातून मागवणार रामलल्लाची मूर्ती

पोर्ट ऑफ स्पेन (त्रिनिदाद) – भारतापासून १४ सहस्र कि.मी. दूर असलेल्या आणि केवळ १४ लाख लोकसंख्या असलेल्या त्रिनिदाद आणि टोबॅगो नावाच्या छोट्या देशाने भव्य श्रीराममंदिर बांधण्याचा निर्णय घोषित केला आहे. या देशात सुमारे ३ लाख ५० सहस्र हिंदु लोकसंख्या आहे. हा देश हिंदु धर्माचे एक प्रमुख सांस्कृतिक आणि आध्यात्मिक केंद्र म्हणून स्वतःला स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाला ‘रामायण देश’ म्हणून संबोधले जाते. त्रिनिदाद आणि टोबॅगोचे मंत्री बॅरी पदारथ यांनी घोषित केले की, श्रीराममंदिराविषयी नेत्यांशी चर्चा झाली आहे.
🇹🇹✨ Trinidad & Tobago to build a Ram Mandir and a ‘Mini Ayodhya’ in Port of Spain to celebrate Indian culture!
🌸 Murthy of Ram Lalla will be brought from India.
🪔 The project aims to promote Hinduism and Sanatan values, reaffirming the island nation’s proud identity as the… pic.twitter.com/e9Rnw47eub
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 27, 2025
देशात धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल ! – मंत्री बॅरी पदारथ
त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये १९ व्या शतकापासून हिंदु परंपरा पिढ्यान्पिढ्या चालत आली आहे. येथील घरांमध्ये आजही भगवद्गीता आणि रामायण भक्तीभावाने वाचले जाते. श्रीराममंदिर प्रकल्पामुळे देशात धार्मिक पर्यटनालाही चालना मिळेल, असा सरकारचा विश्वास आहे. त्रिनिदाद आणि टोबॅगो सरकारने दिवाळीच्या वेळी ही घोषणा केली. सरकार पुढील काही महिन्यांत श्रीराममंदिर प्रकल्पासाठी संपूर्ण आराखडा सादर करेल. या वर्षी अयोध्येतून रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिकृती आणण्यास साहाय्य करणार्यांशीही सरकारने चर्चा केली आहे, असे मंत्री बॅरी पदारथ यांनी सांगितले.
उत्तर अमेरिकेतील हिंदु भक्तांसाठी हे एक प्रमुख आध्यात्मिक आणि सांस्कृतिक केंद्र असेल. न्यूयॉर्कमधील ‘ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ द राममंदिरा’चे संस्थापक प्रेम भंडारी यांनी येथे अयोध्या नगरी स्थापन करण्याचा प्रस्ताव त्रिनिदाद आणि टोबॅगोचे पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर यांना सादर केला आहे. पंतप्रधान कमला प्रसाद बिसेसर हे स्वतः भारतीय वंशाचे आहेत.
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
Trump Warns Iran : आमच्या सैनिकांना हात जरी लावला, तरी युद्ध पेटेल !
भारत बळजबरीने घुसखोरांना बांगलादेशात ढकलत आहे ! – Bangladesh Allegation
पंतप्रधान मोदी मला फार आवडतात, ते माझे चांगले मित्र ! – Donald Trump
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
Firhad Hakim : कोलकात्यातील तृणमूल काँग्रेसचे महापौर फिरहाद हकीम यांचे त्यागपत्र