घुसखोरांची नावे काळ्या सूचीत टाकणार !

मुंबई – बांगलादेशी घुसखोरांची बनावट (खोटी) ओळखपत्रे सिद्ध करून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचे अपप्रकार पुढे आले आहेत. बांगलादेशी घुसखोरांना पकडण्यात आले असले, तरी काही शासकीय योजनांमध्ये ते लाभार्थी असण्याची शक्यता लक्षात घेऊन या घुसखोरांची नावे काळ्या सूचीत टाकण्याची सूचना राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बांगलादेशी घुसखोरांचे बोगस मतदान रोखण्यासाठी सरकारच्या या मोहिमेचा लाभ निवडणूक आयोगालाही होणार आहे.
🚨 Maharashtra steps up against infiltrators! 🇮🇳
✅ Govt to blacklist names of Bangladeshi infiltrators to stop fake voting
⚖️ ATS report: 1,274 Bangladeshi infiltrators face criminal cases.
🚫 Verification underway to ensure no govt benefits go to them.
🇮🇳 Shame it took… pic.twitter.com/GroqEc7hzh
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 25, 2025
अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग यांनी २४ ऑक्टोबर या दिवशी काढलेल्या शासन निर्णयामध्ये शासकीय योजनांचा लाभ मिळू नये, यासाठी बांगलादेशी घुसखोरांची नावे काळ्या सूचीत काढण्याची सूचना करण्यात आली आहे. यासह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर बांगलादेशी घुसखोरांची नावे प्रसारित करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.
गुन्हा नोंदवलेल्या १ सहस्र २७४ घुसखोरांची होणार पडताळणी !
आतंकवादविरोधी पथकाने गुन्हा नोंदवण्यात आलेल्या १ सहस्र २७४ बांगलादेशी घुसखोरांची नावे दिली असून त्यांची नावे कोणत्या शासकीय योजनेत नाहीत ना, याची निश्चिती करण्याची सूचना शासनाकडून देण्यात आली आहे. अशा प्रकारची नावे आढळल्यास ती त्वरित काढून त्याविषयीची प्रत आतंकवादविरोधी पथकाकडे देण्याची सूचना देण्यात आली आहे.
संपादकीय भूमिका
|
ठाणे जिल्ह्यात विविध ठिकाणी घरफोड्या करणारे धर्मांध अटकेत
गोव्यात ४० सहस्र रोहिंग्या आणि बांगलादेशी नागरिक !
अमेरिकेत ख्रिस्त्याकडून धर्म विचारून भारतीय वंशाच्या मुसलमानावर चाकूने आक्रमण
पहिल्या १० गायींसाठी ९० टक्के, तर उर्वरित १० गायींसाठी ७५ टक्के सरकारी अनुदान
गोव्यात कॅसिनोंमधील ‘गेमिंग’ क्षेत्रात २१ वर्षांखालील व्यक्तीला प्रवेश बंदी
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक