
नागपूर – दिवाळीचा सर्वजण आनंद घेत असतांना शहरातील विविध भागांत रात्रभर फटाक्यांमुळे ६ ठिकाणी आग लागल्याच्या मोठ्या घटनांची नोंद झाली आहे. यापैकी ८ रस्ता चौकातील एका मोठ्या ‘स्मार्ट स्टोअर’ला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले आहे. यात कोट्यवधी रुपयांची मोठी हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ही आग फटाक्यांच्या ठिणगीमुळे लागल्याची शक्यता अग्नीशमनदलाने वर्तवली आहे.
शहरातील ‘रिलायन्स स्मार्ट स्टोर’ला रात्री ९ वाजण्याच्या सुमारास लागलेल्या आगीत स्मार्ट स्टोरमधील संपूर्ण साहित्य जळून राख झाले. ३ घंट्यांच्या अथक प्रयत्नानंतर अग्नीशमन दलाला आग विझवण्यात यश आले आहे. या व्यतिरिक्त आगीच्या छोट्या छोट्या तब्बल ६५ घटना शहराच्या विविध भागांतून पुढे आल्या. ज्यात कचर्याला आग लागणे, झाडाला आग लागणे अशा घटनांची अग्नीशमन दलाकडे नोंद झाली आहे. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही; मात्र मालमत्तेची प्रचंड हानी झाली आहे. नागरिकांनी फटाके फोडतांना दक्षता घेणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनांनी पुन्हा एकदा अधारेखित केले आहे.
संपादकीय भूमिका :प्रतिवर्षी दिवाळीत फटाक्यांमुळे आग लागण्याच्या घटना घडतातच. ‘फटाके मोकळ्या मैदानात उडवणे’ यांसारखे काही नियम घालून सरकार त्याविषयी कडक कारवाई का करत नाही ? |
संपादकीय : नद्यांचे ‘प्रशासकीय’ प्रदूषण !
अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहाला दिलेले ‘टिपू सुलतान’चे नाव अवैध !
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
पुण्यातील पाणीटंचाई रोखण्यात महापालिका अपयशी ठरल्याची आयुक्तांची स्वीकृती !
तुर्भे रेल्वेस्थानकाच्या जवळील पदपथांची दुरवस्था !
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !