शबरीमलाचे पर्यटन आणि तीर्थक्षेत्र यांमध्ये रूपांतर करण्याच्या केरळ सरकारच्या योजनेमुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली असून भ्रष्टाचार, मंदिरांवरील राज्याचे नियंत्रण आणि सनातन धर्माला निर्माण झालेला धोका यांविषयी भक्तगण चिंता व्यक्त करत आहेत.
भारतात ‘लास व्हेगस’ सिद्ध करण्यासाठी प्रशासन सिद्ध आहे. ‘लास व्हेगस’ हे अमेरिकेतील शहर झगमगते रात्रीचे जीवन, कॅसिनो, जुगाराची केंद्रे, उपाहारगृहे आणि अर्थातच उंचावरील निवासी सदनिका, राजवाडे अन् बंगले यांसाठी जगभरात ओळखले जाते. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील केरळ सरकारला भगवान अयप्पा प्रमुख देवता असलेल्या शबरीमला या पवित्र मंदिराचे तीर्थयात्रा आणि पर्यटन यांचे एकात्मिक केंद्र म्हणून रूपांतर करण्याची आशा आहे. २० सप्टेंबर या दिवशी आयोजित करण्यात आलेला ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम्’ (जी.ए.एस्.) हा कार्यक्रम ‘ऑपरेशन साबरी’ या उपक्रमाची प्रस्तावना होती.
२३ ऑक्टोबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम्’ कार्यक्रमाला केरळमधील लोकांची अल्प उपस्थिती, शबरीमला मंदिराविषयी चुकीची माहिती पसरवण्याचा धर्मद्वेष्ट्या सरकारचा प्रयत्न, मंदिराची शेकडो वर्षांची परंपरा नष्ट करणारे आणि मंदिरातील अर्पणाचा अवैध वापर करणारे केरळचे सरकार अन् भगवान अय्यप्पा यांच्या मूर्तीच्या तोडफोडीच्या घटनेचा अहवाल प्रसिद्ध न करणारे कम्युनिस्ट पक्षाचे सरकार’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा अंतिम भाग येथे देत आहे.
या लेखाचा आधीचा/मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/969587.html

९. शबरीमला मंदिर सरकारीकरणातून मुक्त करण्याविषयी भक्त आणि हिंदुत्वनिष्ठ यांची मागणी
भगवान अय्यप्पाचे भक्त मंदिराला सरकारी नियंत्रणाच्या बंधनातून मुक्त करण्याची मागणी करत आहेत. ‘हिंदू ऐक्य वेदी’चे कार्यकारी अध्यक्ष वल्सन थिल्लनकेरी म्हणाले, ‘‘सरकार चर्च किंवा मशिदी यांच्या कारभारात हस्तक्षेप करत नाही; पण ते मंदिरांवर नियंत्रण का ठेवत आहेत ?’’
१०. गुरुवायूर येथील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर पूर्णपणे बळकावण्याचा राजकारण्यांचा उद्देश !

गुरुवायूर येथील भगवान श्रीकृष्ण मंदिर हे राजकारण्यांनी पूर्णपणे बळकावण्याच्या उद्दिष्टांच्या रांगेत सर्वांत वरच्या स्थानावर आहे. या मंदिराचे व्यवस्थापन ‘गुरुवायूर देवस्वम् मंडळा’द्वारे केले जाते आणि हे मंडळ मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन् यांच्या मंदिर भेटीच्या वेळी घडलेल्या एका घटनेचे प्रसारमाध्यमांनी मोठ्या प्रमाणावर वृत्त दिले होते. पिनराई यांचा हिंदूंविषयीचा द्वेष सर्वश्रुत आहे. मंदिराच्या एका कोपर्यात त्यांना एक छोटा दिवा दिसला आणि त्यांनी देवस्वम्च्या अधिकार्यांना उपहासाने विचारले, ‘श्रीकृष्ण बसतात ती ही जागा आहे का ?’
११. शबरीमला मंदिराच्या विकासाचे श्रेय स्वतःकडे घेण्याचा केरळ सरकारचा प्रयत्न !
विजयन् यांनी ‘जी.ए.एस्.’मध्ये उपस्थित असलेल्या प्रतिनिधींना सांगितले की, ‘शबरीमला कृती आराखडा योजनेची कार्यवाही करण्यासाठी पुढील ५० वर्षांत त्यांचे सरकार १ सहस्र कोटी रुपये खर्च करण्याची योजना आखत आहे’; पण भगवान अय्यप्पाचे कट्टर भक्त असलेले तमिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई या योजनेविषयी म्हणाले, ‘‘गेल्या ३ वर्षांत शबरीमला मंदिराला भक्तांकडून अर्पण म्हणून १ सहस्र ३०० कोटी रुपये मिळाले. याचा अर्थ प्रतिवर्षी मंदिराला ४२५ कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळते. विजयन् राज्यातील भाविकांना आणि हिंदूंना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत.’’
थिरूवनंतपूरम्मधील पद्मनाभ मंदिराला सरकारीकरणापासून दूर ठेवणारे त्रावणकोरचे राजघराणे !

केरळ सरकारला थिरूवनंतपूरम् येथील पद्मनाभ स्वामी मंदिरावर नियंत्रण मिळवायचे होते. यामुळे राजकारण्यांना ५ लाख कोटींपेक्षा अधिक किमतीचे सोने, मौल्यवान रत्ने आणि इतर मालमत्ता यांवर हात टाकता आला असता; परंतु ही मोहीम अयशस्वी ठरली. ज्यांनी हे मंदिर बांधले ते त्रावणकोरचे राजघराण्ो या संस्थेच्या कारभारावर वज्रमूठ करून नियंत्रण ठेवत आहेत आणि म्हणूनच पद्मनाभ स्वामी मंदिर काळाच्या कसोटीवर टिकून राहिले आहे. राजघराण्याच्या प्रमुखाला प्रतिदिन मंदिरात पूजा करावी लागते, या वस्तूस्थितीची बहुतेक लोकांना जाणीव नाही. आपल्या कौटुंबिक देवतेची पूजा करण्यात अपयश आल्यास त्यांना मंदिराला दंड भरावा लागतो.
– श्री. कुमार चेल्लप्पन
१२. शबरीमला मंदिराविषयीची दुःस्थिती : सनातन धर्माला एक चेतावणी
शबरीमला मंदिराविषयीची ही दुःस्थिती सनातन धर्माला चेतावणी देणारी आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती आतंकवाद्यांनी प्रत्यक्षरित्या मंदिर उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, तर आधुनिक काळातील राजकारणी शबरीमला, गुरुवायूर आणि पद्मनाभ स्वामी मंदिर यांच्या गर्भगृहाचा आत्मा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत.
१३. साम्यवादी राजकीय पक्षाने ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम्’चे आयोजन करणे, हा विरोधाभास !
केरळच्या प्रथम महिला भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी आणि माजी पोलीस महासंचालक (गुप्तचर विभाग) आर्. श्रीलेखा म्हणतात, ‘‘मी शबरीमला येथील घडामोडींमुळे गोंधळून गेली आहे. धर्म आणि देव यांच्या पूर्णपणे विरोधात असलेली एक राजकीय संघटना ‘ग्लोबल अय्यप्पा संगमम्’ आयोजित करत आहे, हा एक विचित्र विरोधाभास आहे. या प्रकल्पामागील तर्क मला समजू शकला नाही; पण असे काहीतरी आहे जे सामान्य डोळ्यांना दिसत नाही.’’
सनातन धर्म वाचवण्यासाठी ‘हिंदु प्रजासत्ताक’ (हिंदु राष्ट्र) हाच एकमेव उपाय !

साम्यवादी आणि काँग्रेस यांच्या षड्यंत्रातून बाहेर पडण्याचा काही मार्ग आहे का ? सनातन धर्म वाचवण्यासाठी आणि हिंदु संघटना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी एकच उपाय आहे. भारताला ‘हिंदु प्रजासत्ताक’ म्हणून घोषित करा आणि राज्यघटनेतून ‘धर्मनिरपेक्षता’ ही संज्ञा काढायला हवी. राज्यघटनेच्या कलम ३० अंतर्गत अल्पसंख्यांकांना दिलेला अधिकार हिंदूंना देण्यात यावा. हा अनुच्छेद अल्पसंख्यांक समुदायांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा आणि त्यांचे प्रशासन करण्याचा अधिकार प्रदान करतो. राज्यघटनेच्या कलम १६ मध्ये असे म्हटले आहे की, ‘कोणताही नागरिक केवळ धर्म, वंश, जात, लिंग, कुळ, जन्मस्थान, निवासस्थान किंवा त्यांपैकी कोणत्याही कारणास्तव राज्याखालील कोणत्याही नोकरीसाठी अथवा पदाच्या संदर्भात अपात्र ठरवला जाणार नाही किंवा त्याच्याविषयी भेदभाव केला जाणार नाही’; पण हिंदूंचे काय होत आहे ? सनातन धर्माच्या अनेक दशकांच्या अभ्यासानंतर हिंदु धर्म स्वीकारणारे आणि कॅनडामध्ये जन्मलेले प्रोटेस्टंट ख्रिस्ती ईश्वर सरन म्हणतात, ‘आज हिंदू त्यांच्या मातृभूमीत दुय्यम दर्जाचे नागरिक बनत आहेत. (‘व्हॉईस ऑफ इंडिया’ने प्रकाशित केलेले, ‘द मिथ ऑफ सेंट थॉमस अँड द मैलापूर शिव मंदिर’ हे पुस्तक) वर्ष २०१४ मधील सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारचा पराभव झाला, ही देवाची कृपा ! संयुक्त पुरोगामी आघाडीने वर्ष २०१४ मधील निवडणूक जिंकली असती, तर हिंदु भारतात चौथ्या श्रेणीचे नागरिक झाले असते. सिग्नोरा आणि तिच्या लुसियाना माफियांमध्ये हिंदूंविषयी अंतर्गत द्वेष आहे.’
– श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.
१४. तमिळनाडूमधील सहस्रो एकर भूमी गायब : राज्य सरकारकडून स्पष्टीकरण नाही !
शबरीमला, गुरुवायूर, पद्मनाभ स्वामी मंदिर ही सूची वाढतच आहे. हे केवळ केरळपुरते मर्यादित नाही. तमिळनाडू आणि कर्नाटक या राज्यांमध्ये परिस्थिती वेगळी नाही. जेव्हा ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभाग’ हा तमिळनाडूतील मंदिरांचे सर्वोच्च प्राधिकरण बनला, तेव्हा राज्यात ४६ सहस्र मंदिरे होती आणि त्यांच्याकडे ५२५ सहस्र एकर भूमी होती; परंतु आज ही प्र्रमुख मालमत्ता ४ सहस्र एकरांवर आली आहे. तमिळनाडूचे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई यांच्या म्हणण्यानुसार गायब झालेल्या सहस्रो एकर भूमीविषयी विचारले असता ‘हिंदु धार्मिक आणि धर्मादाय देणगी विभाग’ आणि एम्.के.स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड सरकार उत्तर देत नाही.’’
१५. धर्मस्थळ मंदिराला लक्ष्य करण्यासाठी इस्लामी आणि ख्रिस्ती यांना साम्यवाद्यांचा पाठिंबा

धर्मस्थळ मंदिर हे इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांधांचे नवे लक्ष्य आहे अन् त्याला कर्नाटकातील काँग्रेस-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षांचा पाठिंबा आहे. धर्मस्थळ मंदिराच्या एका माजी कर्मचार्याने शेकडो तरुण महिलांचे मृतदेह मंदिराच्या आवारात पुरले असल्याचा आरोप केल्याने या सगळ्याचा प्रारंभ झाला. कर्नाटक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर शोध घेतला असला, तरी त्यांना मृतदेहांशी संबंधित काहीही मिळू शकले नाही. धर्मस्थळाची प्रतिमा मलीन करण्याच्या या षड्यंत्राविषयी अनेक तर्कवितर्क ऐकले जात आहेत. मंदिराचे पारंपरिक संरक्षक वीरेंद्र हेगडे हे अब्राह्मिक धर्मवाद्यांचे लक्ष्य आहे. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गातील हिंदूंना आर्थिक साहाय्य करून हेगडे यांनी मंदिराच्या सभोवतालच्या ग्रामीण भागात क्रांती घडवून आणली आणि यामुळे जे कर्जदारांकडून व्याज लुटत होते, ते या भागातील खासगी सावकार अप्रसन्न झाले.
१६. हिंदूंचे सण आणि उत्सव यांच्यावर बंधने लादून त्यांचे महत्त्व नष्ट करण्याचा प्रयत्न !
केरळमधील हिंदूंचा प्रमुख सण असलेल्या ‘ओणम्’चे राज्यातील सर्वांत मोठ्या खरेदी उत्सवात रूपांतर झाले आहे. मंदिरे आणि सणांवरील आक्रमणांमागे एक पद्धत आहे. पर्यावरणवादी, पर्यावरणशास्त्रज्ञ आणि प्राणीप्रेमी यांचे रूप धारण करणारे स्वयंघोषित कार्यकर्ते मंदिरे अन् संबंधित उत्सवांवर अविरत टीका करत आहेत. त्यांच्या मागण्यांमध्ये मंदिरांच्या मिरवणुकांमध्ये हत्तींना फिरवण्याची प्रथा असणे आणि दिवाळीत फटाके फोडण्यावर संपूर्ण बंदी घालणे यांचा समावेश आहे. हिंदु सणांच्या वेळी मंदिरांमध्ये मोठ्याने संगीत वाजवण्यासही त्यांचा विरोध आहे. हे म्हणजे हिंदु सणांवर हळूहळू ‘विषप्रयोग’ करून त्यांना मृतवत् करण्याखेरीज दुसरे-तिसरे काही नाही.
– श्री. कुमार चेल्लप्पन, ज्येष्ठ पत्रकार, केरळ.
संपादकीय भूमिकासनातन धर्म आणि हिंदु यांना नामशेष होण्यापासून वाचवण्यासाठी एकच उपाय आहे तो म्हणजे भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करणे ! |
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
मंदिर संस्कृती : राष्ट्रनिर्मिती, अर्थव्यवस्था आणि समाजउन्नती यांचे केंद्र !
मंदिरे : राष्ट्ररचनेचे मजबूत आधारस्तंभ !
संपादकीय : हिंदू जात्यात !
ताजमहालच्या खाली दडवण्यात आलेले सत्य !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !