पंतप्रधान मोदी यांना दूरभाष करून दिल्या शुभेच्छा !

वॉशिंग्टन (अमेरिका) – थोड्याच वेळात, आपण एक दिवा लावू, जो अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवतो. हे आपल्याला नेहमी ज्ञानाच्या मार्गावर चालण्याची आणि परिश्रमपूर्वक काम करण्याची आठवण करून देते, अशा शब्दांत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये दिवाळी साजरी करतांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही दूरभाष करून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला ‘फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन’चे (एफ्.बी.आय.चे) संचालक काश पटेल, गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड, व्हाईट हाऊसचे उपमाध्यम सचिव कुश देसाई, भारतातील अमेरिकेचे राजदूत सर्जियो गोर आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा यांच्यासह अनेक वरिष्ठ अमेरिकी प्रशासन अधिकारी उपस्थित होते.
🇮🇳🤝🇺🇸 President Donald Trump celebrates Diwali at the White House ✨🪔
Extends warm greetings to PM Modi, emphasizing unity against terrorism 🔥
“May our two great democracies illuminate the world with hope and stand united against terrorism in all its forms.”
PC:… pic.twitter.com/62IfcYzu13
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 22, 2025
ट्रम्प म्हणाले की, मी पंतप्रधान मोदी यांच्याशी दूरभाषवर चर्चा केली. आम्ही व्यापार आणि प्रादेशिक शांततेवर चर्चा केली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध नाही, हे खूप छान आहे. मोदी एक महान व्यक्ती आहेत आणि गेल्या काही वर्षांत ते माझे चांगले मित्र बनले आहेत.
पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, राष्ट्रपती ट्रम्प, तुमच्या दूरभाषसाठी आणि दिवाळीच्या संदेशाबद्दल धन्यवाद. प्रकाशाच्या या सणानिमित्त आपल्या दोन महान लोकशाही देशांची भागीदारी जगासाठी आशेचा किरण बनो आणि सर्व प्रकारच्या आतंकवादाविरुद्ध एकत्र उभे राहो.
Thank you, President Trump, for your phone call and warm Diwali greetings. On this festival of lights, may our two great democracies continue to illuminate the world with hope and stand united against terrorism in all its forms.@realDonaldTrump @POTUS
— Narendra Modi (@narendramodi) October 22, 2025
|

फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे (एफ्.बी.आय.चे) संचालक काश पटेल यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर अनेकांनी टीका करत लिहिले, ‘सर, कृपया अमेरिकेत तुम्ही विदेशातील उत्सवांना प्रोत्साहन देऊ नका. हा उत्सव इथला नाही, कृपया तो इथे आणण्याचा प्रयत्न थांबवा. अमेरिका हा ख्रिस्ती देश आहे. तुम्हाला हे ठाऊक नाही का? सर्व हिंदूंना इथून हद्दपार केले पाहिजे.’ (अशी मागणी करणारे कोण असणार ? हे वेगळे सांगायला नको. अमेरिकेतून धर्मांधांना, जिहाद्यांना, खलिस्तान्यांना हाकलून लावा, अशी मागणी कुणी कधी करत नाही, हे लक्षात घ्या ! – संपादक)
Bangladesh Hindu Girl Murder : बांगलादेशात ८ वर्षांच्या हिंदु मुलीचे अपहरण करून हत्या !
युक्रेन-रशिया युद्धात ट्रम्प यांनी फेटाळला होता भारतीय सैनिकांना शांतता मोहिमेसाठी पाठवण्याचा प्रस्ताव !
पाकिस्तानची स्तुती करणार्या अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांवर त्यांच्याच पक्षातील खासदार भडकले !
Bangladeshi Waiter : इटलीच्या उपाहारगृहामध्ये बांगलादेशाच्या मुसलमान वेटरचे भारतीय महिलांशी असभ्य वर्तन !
Resolution Over Iran War : इराणविरुद्धची सैनिकी कारवाई रोखणारा ठराव अमेरिकेच्या संसदेच्या वरिष्ठ संभागृहात संमत
Europe Heatwaves : युरोपमध्ये उष्णतेची लाट : तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक